आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाेवैज्ञानिक प्रभाव टाकणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका : कन्हैया कुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पंतप्रधान माेदी म्हणतात त्यांचे सरकार २०२२ पर्यंत असेल. मात्र, वास्तव वेगळे अाहे. येेऊ घातलेल्या लाेकसभेच्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र माेदी अशी लढत रंगविली जाईल. मात्र, हे लक्षात घ्या अापण थेट पंतप्रधान निवडून देत नाही तर लाेकसभेचा सदस्य निवडून देताे. जाे राजकीय पक्ष जास्त जागा मिळविताे, त्याचे सदस्य पंतप्रधान निवडतात. त्यामुळे लढत थेट माेदी विरुद्ध राहुल गांधी अाहे, हे दाखवून तुमच्या मेंदूवर मनाेवैज्ञानिक प्रभाव पाडणाऱ्यांच्या जाळ्यात फसू नका. लाेकशाहीचे हे मंदिर ज्यावर उभे अाहे, त्याची शेवटची वीट अापण भारतीय लाेक अाहाेत, हे विसरू नका. देशातील सद्यस्थिती पाहता लाेकांची जबाबदारी वाढली असून ती त्यांनी याेग्यरित्या पार पाडावी, असे अावाहन जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने नाशिककरांना केले. 


डाॅ. नरेंद्र दाभाेलकर स्मृती व्याख्यानमालेमध्ये 'युवकांनाे निर्भय बना, प्रश्न विचारा' या विषयावर कन्हैैया कुमार बाेलत हाेता. व्यासपीठावर पल्लवी चिंचवाडे, समाधान बागूल हाेते. अापण घाेडा नाही की, काेणी जातीचा चाबूक मारेल तर जाेरात चालू. काेणी धर्माचा चाबूक मारेल तर जास्त जाेरात चालेल, याकडे लक्ष वेधतानाच प्रश्न विचारलेच पाहिजे. पंतप्रधानांनी लाखाेंचा सूट घातला तर देशासाठी काहीही झाले तरी देश. मात्र, देश बनताे ताे देशाच्या लाेकांमुळेच. अाज बारा हजार शेतकऱ्यांच्या अात्महत्या एका बाजूला हाेत असताना विमा कंपनी हजाराे काेटी कमावते. 


पाच लाख इंजिनिअर्स देशात दरवर्षी शिक्षण पूर्ण करून नाेकरीसाठी बाजारात येतात. मात्र, अवघ्या दीड लाख नाेकऱ्याही तयार हाेत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र माेदींना विचारण्यात अाले, राफेलची किंमत एक हजार काेटींनी एका विमानामागे कशी वाढली. मात्र, त्याचे उत्तर ते का देत नाहीत, असा खडा सवाल त्यांनी केला. 

 

प्रचंड पाेलिस बंदाेेबस्त
कन्हैया कुमारची सभा परशुराम साइखेडकर नाट्यगृहात सायंकाळी हाेती. दुपारपासूनच प्रचंड पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. 


माझी पीएच.डी. चुकीची का? 
अापण जाे अपराध केलाच नाही, ताे मी कधीच मान्य करीत नाही. दाेन वर्षे झाली तरी अद्याप साधे अाराेपपत्रही दाखल हाेऊ शकलेले नाही. मी ३० वर्षांचा असूनही जेएनयूचा विद्यार्थी कसा? असा भ्रम पसरविला जाताे. मात्र, मी प्रश्न विचारताे माेदी ३५ व्या वर्षी एम.ए. हाेतात. मग मी ३० व्या वर्षी पीएच.डी. झालाे तर काही चुकले का? जनतेच्या कराच्या पैशांतून अाम्ही विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे मान्य करून तुमच्या कराच्या प्रत्येक पैशांचे माेल अाम्हाला असून कष्टाने शिक्षण पूर्ण करीत असल्याचे त्याने सांगितले. 


दाभाेलकरांचे मारेकरी का पकडले नाही? 
डाॅ. दाभाेलकरांचे मारेकरी पाच वर्षांत पकडले गेले नाही. पाच वर्षे प्रकरण सीबीअायकडे हाेते. स्केचही जारी झाले. तरीही मारेकरी सापडले नाही. कारण तसे पाेलिसांना सरकारने सांगितले असेल. गाैरी लंकेश प्रकरणात कर्नाटक पाेलिसांनी पकडल्यावरच महाराष्ट्र पाेलिसांना ते कसे सापडतात? कारण, कर्नाटक पाेलिस त्यांना पकडून घेऊन गेले असते. देवेंद्र फडणवीसांनी काेणाला काॅल केला? हे त्यामागील कारण असावे, अशी शंकाही कन्हैयाने व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मालेगावकर यांनी केले. अाभार समीर अहिरे यांनी मानले. 

बातम्या आणखी आहेत...