आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JNU Student Sharjeel Imam Has Been Arrested From Bihar By Delhi Police News And Updates

जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला बिहारमधून अटक, आसामला भारतापासून तोडण्याचे केले होते वक्तव्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरजील इमामवर दाखल करण्यात आला होता देशद्रोहाचा गुन्हा
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 राज्यांचे पोलिस घेत होते शोध
  • दिल्ली पोलिस आणि बिहार पोलिसांच्या गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी शरजिल इमाम याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारी रात्री त्याच्या भाऊ आणि मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजिलला बिहारमधील जहानाबाद येथून मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. दिल्ली आणि बिहार पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. दिल्ली, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि उत्तर प्रदेश पोलीस शरजील इमामचा शोध घेत होते. अखेर बिहारमध्ये त्याला पकडण्यात आले. 
जेएनयूमध्ये पीएचडी करत असलेल्या शरजील इमामचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडिओनंतर तो चर्चेत आला. या व्हिडिओसाठी 6 राज्यांच्या पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दिल्ली पोलिस आणि बिहार पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई शरजिलच्या भावाच्या चौकशीतून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे केली. शरजील इमामच्या अटकेला जहानाबाद एसपींनी दुजोरा दिला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात, आसामला भारतापासून वेगळे करण्याबाबत वक्तव्य शरजील इमामने केले होते. याशिवाय मुस्लिमांनी देशभर चक्काजाम करण्याचे आवाहनही शरजील इमामने केले होते.

बातम्या आणखी आहेत...