आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'JNU Student Union Damaged Atmosphere, They Are Being Violent And Troubled, For The First Time' Vice Chancellor Jagdish Kumar

'जेएनयू विद्यार्थी संघटनेने वातावरण खराब केले, ते हिंसक आणि उपद्रवी हाेत आहेत, हेे पहिल्यांदाच' - कुलगुरू जगदेशकुमार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : जेएनयू आधी शुल्कवाढ व आता बुरखाधाऱ्यांच्या हिंसाचारामुळे चर्चेत आहे. जेएनयूमधील परिस्थितीबाबत कुलगुरू एम. जगदेशकुमार यांच्याशी केलेल्या चर्चेचा काही भाग...

विद्यार्थ्यांच्या तक्रारी तरी ऐकून घ्यायला हव्या हाेत्या...

२८ ऑक्टाेबरला निर्णयानंतर अधिकारी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले. विद्यार्थ्यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. मीही गेलाे, पण ते हल्ल्याच्या इराद्याने माझ्याकडे येऊ लागले.

विद्यार्थ्यांशी तुम्ही अगाेदर संवाद का साधला नाही?

शुल्काचा निर्णय प्रक्रियेनंतर घेतला हाेता. आम्ही प्रक्रियेचा पाठपुरावा करत हाेताे.

परिस्थिती बिघडण्याची शक्यता हाेती तर काळजी का घेतली नाही?

आम्ही त्यांच्याशी (जेएनयूएसयू) चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. ते हिंसक व उपद्रवी झाले, असे पहिल्यांदाच घडले आहे.

वातावरण शुल्क की सीएए मुद्द्यावर बिघडले?

त्यासाठी थाेडे मागे जावे लागेल. काही म्हणतात की, आम्ही जेएनयूमध्ये बदल करत आहाेत. जागतिक संशाेधनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा जेएनयूचा उद्देश आहे. सध्या जे हाेत आहे त्याने भविष्य घडणार नाही.

भाजप नेते, मंत्री जेएनयूला तुकडे-तुकडे टाेळीचा अड्डा म्हणते हे कितपत याेग्य वाटते?

आपला देश लाेकशाही देश आहे. सगळ्यांना विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.

दीपिका आल्यावर आपले मतपरिवर्तन हाेते, असे का?

महान व्यक्ती आंदाेलनकारी विद्यार्थ्यांबराेबर येणे हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी अभ्यास करणाऱ्या त्या हजाराे विद्यार्थ्यांबद्दलही बाेलावे. दीपिकाने त्यांच्याबाबतीत काहीतरी बाेलावे.
 

बातम्या आणखी आहेत...