आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिची आपबिती.. मला माहिती होती मी संबंधांना कितीही नकार दिला तरी तो माझा रेप करेलच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कठुआ कांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोजले. त्यानंतर आता मीटू मुव्हमेंटने संपूर्ण समाजालाच हादरा दिला आहे. या मीटू चळवळीतच आता एका विद्यार्थिनीने तिची आपबितीची व्यथा मांडली आहे. ही विद्यार्थिनी आहे, जेएनयूमधील. तिने सांगितले की, कठुआ गँगरेपच्या आरोपींविरोधात आंदोलन करणाऱ्यांपैकी एकाने तिच्यावर रेप केला. 


या तरुणीने मीडियाला तिची आपबिती सांगताना म्हटले की, तो त्या रात्री तिला गेटवर भेटण्यासाठी हट्ट करत होता. 27 मार्चच्या दिवशी एका कार्यक्रमासाठी त्याला जेएनयूमध्ये आमंत्रित करण्यात आले होती. त्यांना आमंत्रित करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये माझाही समावेश होता. त्याच काळात कोणीतरी त्याच्यावर हल्ला केल्याने तो सुरक्षेची मागणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात म्हणजे दिल्लीत आला होता. 


तरुणीने सांगितले की, ते अनेकदा फोनवर बोलले होते. त्याने तिला अनेकदा असे काही प्रश्नही विचारले होते, जे फार चांगले किंवा योग्य नव्हते. यादरम्यान तो जेएनयूमध्ये आला आणि त्याने तरुणीला लग्नाला मागणी घातली. तो आधीच विवाहित असून पत्नीच्या हत्येच्या प्रयत्नाचा खटला त्याच्यावर सुरू आहे, हे तरुणीला माहिती नव्हते. त्याने या तरुणीला भेटण्यासाठी 40 वेळा फोन केले. तिची इच्छा नव्हती तरी त्याने वारंवार फोन केल्याने ती जेएनयूच्या गेटवर भेटायला गेली. त्याठिकाणी तो एका भाड्याच्या गाडीमध्ये तिची वाट पाहत होता. तरुणी त्याच्याबरोबर गाडीत बसली. काही वेळात ते बटला हाऊस परिसरात पोहोचले. तेव्हा रात्रीचे 12.30 वाजले होते. तो तरुणीला घेऊन एका इमारतीतील फ्लॅटमध्ये गेला. मला फार विचित्र वाटत होते. पुढे काय होणार हेही तिला जाणवले होते. अखेरच तेच झाले. त्याने सेक्सची डिमांड केली. आपण कितीही नकार दिला तरी तो आपल्यावर रेप करणारच हे तरुणीला माहिती होते. त्यानंतर जे घडले ते अत्यंत वाइट होते. 


तरुणीने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीच्या एका जवळच्या नातेवाईक मुलीवर बलात्कार प्रकरणीही अटक झाली होती. नुकताच दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो जामीनावर परतला आहे. तरुणीने या व्यक्तीचे नाव घेतलेले नाही, पण संदर्भ पाहता कठुआ कांडामुळे चर्चेत आलेल्या तालिब हुसैनवर हे आरोप झाल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...