आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना, फीस वाढविरोधात सुरू आहे विद्यार्थ्यांचे आंदोलन  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी(जेएनयू) मधील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. पण, अद्याप विद्यार्थ्यांचा राग शांत झालेला नाहीये. विद्यार्थ्यांनी आज (गुरुवार)परत यूनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय इमारतीत घुसून जोरदार प्रदर्शन केले. त्यांनी वाढलेली फीस पूर्णपणे माफ करण्याची मागणी केली, तसेच कँपसमधील स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचीही नासधूस केली.

आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणने आहे की, जेएनयू अॅडमिनिस्ट्रेशनकडून जाहीर केलेली मदत फक्त आयवॉश आहे. नाराज विद्यार्थ्यांनी काल कुलगुरू कार्यालयाची नेम प्लेट तोडून त्यावर काळं फासलं, तसेच स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यावर अभद्र टीप्पणी लिहिली. जवाहर लाल नेहरू यूनिव्हर्सिटीचे विद्यार्थी वाढलेली फीस आणि हॉस्टेल मॅनुअलमध्ये बदल केल्याच्या विरोधात मागील 15 दिवसांपासून विरोध करत आहेत, पण बुधवारी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून ट्वीट करुन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगण्यात आले. तरीदेखील, विद्यार्थ्यांचा राग शांत झालेला नाहीये.

काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI चे नेता सन्नी धिमानने सांगितले की, विवेकानंद यांच्या पुतळ्याची नासधुस केल्याची आम्ही कडक निंदा करतोत. आमच्या संघटनेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारचे काहीच काम केलेले नाहीये. सध्या आम्ही मूर्तीवर लिहीलेली टीप्पणी स्वच्छ केली आहे. तसेच, आंदोलनकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर पुतळ्याची नासधुस केल्याचा आरोप लावला आहे.

बातम्या आणखी आहेत...