आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी(जेएनयू)मधील विद्यार्थ्यांनी आज(सोमवार) हॉस्टल फी वाढवल्याविरोधात राष्ट्रपती भवनाकडे मार्च काढला. या दरम्यान पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढला आणि पोलिसांना मुलांवर लाठीचार्ज करावा लागला. विद्यार्थ्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटायचे होते. सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीतील उद्योग विहार, लोक कल्याण मार्ग आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनला बंद करण्यात आले होते.
या मार्चला थांबवण्यासाठी यूनिव्हर्सिटी कँपसबाहेर पोलिस तैनात होते, पण नंतर बॅरिकेड्स उघडावे लागले. पोलिसांनी बाबा गंगनाथ मार्गदेखील मोकळा केला. पोलिसांनी सरोजनी नगर डेपोपर्यंत मार्च काढण्याची परवानगी विद्यार्थ्यांना दिली होती. त्यापुढे जाण्यावरुन पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढला. या मार्चमध्ये अंदाजे 5 हजार विद्यार्थी आले होते.
पोखरियाल 6 तास कँपसमध्ये अडकले होते
11 नोव्हेंबरला जेएनयू विद्यार्थ्यांनी विरोध मार्च काढला होता. तेव्हा जेएनयूपासून अंदाजे 3 किलोमीटर दूर एआयसीटीईचे गेट बंद केलेहोते, तिथे दीक्षांत कार्यक्रम सुरू होता. यात उपराष्ट्रपती वेंकैया नायडू आणि मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे पोखरियाल 6 तास कँपसमध्येच अडकले होते.
हॉस्टेल आणि मेस फी वाढवल्यामुळे सुरू झाला वाद
जेएनयूने हॉस्टेलमधील सिंगल रूमचा किराया 10 रुपयांवरुन 300 रुपये तर डबल रुमचा किरया 20 रुपयांवरुन 600 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच, मेसची फी 5,500 रुपयांवरुन 12,000 रुपये करण्याचे ठरवले होते. यामुळे विद्यार्थ्यांनी विरोध केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.