आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) शुल्कवाढ आणि ड्रेसकोडच्या विरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन १५ व्या दिवशी तीव्र झाले. सोमवारी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सकाळपासूनच पोलिस तैनात करण्यात आले होते. जेएनयूपासून सुमारे ३ किमी अंतरावरील एआयसीटीईचे प्रवेशद्वार करण्यात आले होते. या ठिकाणी पदवी प्रदान समारंभ सुरू होता. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मानव विकास मंत्री रमेश पोखरियाल समारंभात उपस्थित होते. आंदोलनामुळे रमेश पोखरियाल समारंभ स्थळावरून सायंकाळपर्यंत निघू शकले नव्हते. पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक उडाली. विद्यार्थ्यांनी बॅरिकेड तोडले. ‘दिल्ली पोलिस गो बॅक’ अशा घोषणा देत होते. कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना चोर म्हणत होते. विद्यार्थी नेत्यांनी पोखरियाल यांची भेट घेतली.
विद्यार्थ्यांना या मुद्द्यांवर आक्षेप
> विद्यापीठाने वसतिगृह शुल्कात मोठी वाढ केली. १४ वर्षांपासून वसतिगृह शुल्क रचनेत बदल केला नव्हता, असे प्रशासनाचे म्हणणेे.
> आधी डबल सीटर खोलीचे भाडे १० रुपये होते, जे वाढवून ३०० रुपये दरमहा करण्यात आले. तर सिंगल सीटर खोलीचे भाडे २० रुपयांवरून ६०० रुपये करण्यात आले.
> वन टाइम मेस सिक्युरिटी शुल्क ५५०० रुपयांवरून १२००० रुपये करण्यात आले.
> रात्री ११ किंवा जास्तीत जास्त ११.३० वाजेनंतर विद्यार्थ्यांना वसतिगृहातच राहावे लागेल, बाहेर जाता येणार नाही.
> नव्या नियमानुसार डायनिंग हॉलमध्ये योग्य कपडे घालूनच यावे लागेल.
जेएनयूत ४०% विद्यार्थी गरीब
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ते वसतिगृह नियमावली, पार्थसारथी टेकड्यांवर प्रवेश, विद्यार्थी संघ कार्यालयावर कुलूप लावल्याविरोधात आंदोलन करत आहेत. नियमावलीत शुल्कवाढ व ड्रेसकोडसारखे प्रतिबंध लादण्यात आले आहेत. आम्ही १५ दिवसांपासून विरोध करतोय. मात्र, कुलगुरू आमच्याशी चर्चेला तयार नाहीत. येथे जवळपास ४०% विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. वसतिगृह शुल्क ६ ते ७ हजार वाढवण्यात आले. गरीब विद्यार्थी कसे शिकतील?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.