आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JNU : The Professor Along With The Students Took To The Streets Demanding The Removal Of The Vice Chancellor

कुलगुरूंना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक उतरले रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यापीठातील मारहाणीचा निषेध, चाैकशी करण्याची मागणी
  • मंंडी हाऊस ते जंतरमंतरपर्यंत रॅली, राष्ट्रपती भवनकडे जाण्याचा प्रयत्न

​​​​​​​नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्या ५ जानेवारी राेजी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ गुरुवारी जेएनूयूतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मंडी हाऊसपासून जंतरमंतरपर्यंत रॅली काढली. या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. कन्हैयाकुमारही रॅलीत सहभागी झाला होता. या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

विद्यार्थ्यांनी रॅली केंद्रीय मानव विकास मंत्रालयापर्यंत काढण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलिसांनी शास्त्रीभवनजवळ ही रॅली अडवली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या रॅलीत भाकपचे नेते सीताराम येच्युरी, डी. राजा, प्रकाश करात आणि वृंदा करात, तसेच शरद यादव सहभागी झाले होते. रॅलीतील विद्यार्थ्यांनी घोषणा लिहिलेले फलक हाती घेतले होते. कुलगुरूंना पदावरून हटवण्यात यावे आणि या हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

५ जानेवारी रोजी जेएनयू परिसरातील साबरमती वसतिगृहात तोंडावर फडके घेतलेल्या बदमाशांच्या गटाने हल्ला करत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली होती. यानंतर देशभर वातावरण तापले.

हिंसाचाराच्या चौकशीसाठी विद्यापीठाने स्थापन केली पाचसदस्यीय चौकशी समिती

जेएनयूत झालेल्या हिंसाचाराच्या तपासासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रशासन उजव्या विचारसरणीच्या विशेषत: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बाजू घेत असल्याचा आरोप होत असल्याने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी ही समिती स्थापन केली. या समितीत प्रा. सुशांत मिश्रा, मझहर आसिफ, सुधीर प्रताप सिंग, संतोष शुक्ला आणि भगवती दास यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना तपास समितीला सहकार्य करण्याचे आणि समन्वय साधण्याचे सांगण्यात आले आहे. समिती लवकरच अहवाल सादर करेल.
 
जेएनयूच्या कुलगुरूंना हटवण्याची मागणी करत विद्यार्थ्यांची मंंडी हाऊस ते जंतरमंतरपर्यंत रॅली काढत आंदोलन केले.
 

बातम्या आणखी आहेत...