आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयू विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं -आमदार रोहित पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सरकारने भरती प्रक्रियेसाठी राज्य लोकसेवा आयोगाला बळ द्यायला हवे'

औरंगाबाद- जेएनयूमधील विद्यार्थी शुल्कवाढीविरोधात  आंदोलन करत होते. त्या विद्यार्थ्यांना बाहेरून येऊन मारहाण करणे चुकीचे आहे. खरेतर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला हवे होते. असे मत, आमदार रोहित पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

शरद पवार प्रतिष्ठाणतर्फे बलवंत वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी व्यासपीठावर डॉ. नरेंद्र काळे, डॉ. उल्हास उढाण, नवनाथ देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, महापरीक्षा पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. लाखो बेरोजगारांचा रोष लक्षात घेत सरकारने पोर्टल बंद करत ‘एमपीएससी’ला पाठबळ दिले पाहिजे.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांशी ते संवाद साधत होते. त्याचवेळी महापरीक्षा पोर्टल मागे मोठी ताकद असल्याचे सांगत नेमकी ताकद कोणाची याबाबत मात्र, बोलणे टाळले. पवार म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना असो की इतरवेळी आपण इतरांशी स्पर्धा करण्याचे टाळायला हवे.


राज्यातील बेरोजगाराची प्रश्न मोठा आहे.  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचवेळी भरती प्रक्रिया रखडलेली दिसते. अनेक विभागांमध्ये जागा रिक्त आहेत. सरकारने भरती प्रक्रियेसाठी राज्य लोकसेवा आयोगाला बळ द्यायला हवे. त्यात काही त्रुटी असतील त्या दूर करता येवू शकतात. महापरीक्षा पोर्टलबाबत अनेक त्रुटी आहेत त्यामुळे अशाप्रकारचे पोर्टल बंद होण्याची गरज आहे. येत्या अधिवेशनातही हा प्रश्न मी मांडेल.


शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी व्यवसायाकडेही दुर्लक्ष करता कामा नये. राज्य, देशासह जागतिक पातळीवर काय घडामोडी घडत आहेत याकडेही आपले बारकाईने लक्ष असायला हवे. नोटबंदी व त्यानंतर लगेच आलेल्या जीएसटीमुळे देशाचे वाटोळे झाल्याचा आमदार पवार यांनी केला. ते म्हणाले, देशात असंघटीत कामगारांची संख्या मोठी आहे. छोट्या मोठ्या नोकरी, काम करणाऱ्या अशा कामगारांची संख्या ५६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अशा धोरणांमुळे या वर्गातील सर्वाधिक कामगारांना फटका बसला अनेकांच्या हातची कामे गेली कारण त्यांना कामावर ठेवण संबंधित व्यावसायिकांना आर्थिक अडचणीचे ठरले असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...