आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जानेवारी रोजी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेवर सोमवारी सुनावणी केली. तीन प्राध्यापकांनी उच्च न्यायालयाला अपील केली होती की, हिंसेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश द्यावेत. यावर कोर्टाने पोलिस, दिल्ली सरकार, व्हॉट्सअॅप, अॅपल आणि गूगलकडून मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे. सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत जेएनयू प्रशासनाकडून हिंसेचे फुटेज सुरक्षित ठेवण्याबाबत प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान आम्ही व्हॉट्सअॅपला हिंसेशी संबंधित मेसेज करणारे 'यूनिटी अगेंस्ट लेफ्ट' आणि 'फ्रेंड्स ऑफ आरएसएस' या दोन ग्रुपचा डेटा सुरक्षित ठेवण्यास सांगतिले असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
घटनेच्या आठवडाभरानंतर वर्ग झाले सुरू
या दरम्यान जेएनयूमध्ये 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसेच्या एक आठवड्यानंतर वर्ग सुरू झाले. मात्र विद्यार्थी संघटना हॉस्टेल फी वाढ आणि विद्यार्थ्यांच्या निलंबनाविरोधा प्रदर्शन सुरूच राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठई सेमिस्टर रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 15 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान रविवारी संध्याकाळपर्यंत 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचे रजिस्ट्रार प्रमोद कुमार यांनी सांगितले.
नकाबधाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटली
हिंसाचारात सामील झालेल्या दोन नकाबधारी लोकांसमवेत दिसलेल्या महिलेची ओळख दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी म्हणून झाली आहे. हिंसाचाराचा तपास करत असलेली एसआयटी टीम सोमवारी विद्यार्थिनीला नोटीस पाठवणार आहे. तसेच तिला चौकशीत सामील होण्यासाठी आणि दोन नकाबधाऱ्यांची ओळख पटवण्यास सांगण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.