आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JNU Violence: Police Identifies Masked Woman In Viral Video, ABVP Admits She Is Their Member

हिंसाचाराच्या दिवशी व्हायरल व्हिडिओतील ही तरुणी एबीव्हीपीचीच! दिल्ली पोलिसांनी दिला दुजोरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणीसह दोन्ही युवकांना दिल्ली पोलिसांकडून नोटीस, तिघांचेही फोन बंद
  • कोमलने महिला आयोगाकडे मागितली दाद, म्हणे- मला बदनाम केले जातेय

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या टीमने एका नकाबधारी तरुणी आणि दोन तरुणांचा पर्दाफाश केला आहे. हिंसाचाराच्या दिवशी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक तरुणी आणि दोन तरुण जेएनयूच्या विद्यार्थ्यांना धमकावताना दिसून आले. त्या तिघांनीही आपले चेहरे झाकले होते. आता या नकाबामागील चेहरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ता कोमल शर्माचा असल्याचे समोर आले आहे. कोमल दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या दौलतराम कॉलेजची विद्यार्थिनी आहे. एबीव्हीपीने सुद्धा ती आपल्याच संघटनेची सदस्य असल्याची कबुली दिली. 

नाव येताच कोमलची महिला आयोगाकडे दाद...
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात कोमलचे नाव जाहीर केल्यानंतर तिला आणि इतर दोघांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. सोबतच, तिघांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या सर्वांनी आपले मोबाइल बंद केले. दरम्यान, आपले नाव आल्याची माहिती मिळताच संशयित आरोपी कोमलने राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. आपल्याला विनाकारण बदनाम केले जात आहे अशी तक्रार तिने केली आहे.

तिघांचा कसून शोध घेतला जात आहे -पोलिस


दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, जेएनयू हिंसाचार प्रकरणात चौकशीसाठी चुनचुन कुमार आणि दोलन सामंता यांना बोलावण्यात आले. दोघांना दिल्ली पोलिसांनी संशयित आरोपी म्हटले आहे. पोलिसांची एक विशेष टीम आता जेएनयूमध्ये जाऊन उलट तपास करत आहे. सोबतच, नकाबधारी विद्यार्थी अक्षत अवस्थी, रोहित शहा आणि कोमल शर्मा यांचा सध्या कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दावा केला, की त्यांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 160 अंतर्गत कोमल आणि इतर दोन युवक अक्षत तसेच रोहित यांना नोटीस बजावली आहे.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यापासून कोमल गायब


एबीव्हीपी दिल्लीचे राज्य सचिव सिद्धार्थ यादव यांनी कोमल आपल्याच संघटनेची सदस्य असल्याचे मान्य केले. जेएनयू हिंसाचारानंतर या तिघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि तिघांनी भरपूर ट्रोल करण्यात आले. तेव्हापासूनच कोमलशी आमचा संपर्क झालेला नाही असा दावा यादव यांनी केला. सोबतच, ती आपल्या कुटुंबियांसोबत आहे अशी माहिती मिळाली होती. 5 जानेवारी रोजी नेमके काय घडले याचा तपास पोलिसच नाही तर एबीव्हीपी सुद्धा करत आहे. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनादेखील मारहाण करण्यात आली असा दावा एबीव्हीपीने केला. एका माध्यमाशी संवाद साधताना या संघटनेने स्पष्ट केले, की रोहितचा हिंसाचाराशी काहीच संबंध नाही. तर अक्षत एबीव्हीपीचा सदस्यच नाही. हे दोघे जेएनयूमध्ये फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत.