आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या संधी : कृत्रिम बुद्धिमत्ता, यांत्रिकी शिकवण, ग्राहकांशी मधुर नातेसंबंध या युक्ती शिकल्यास विम्याच्या क्षेत्रात जास्त रोजगाराच्या संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात खासगी क्षेत्रालाही जीवन विम्याची परवानगी मिळाल्यामुळे आणि एफडीआयची मर्यादा २६%वरून वाढवून ४९ टक्के केल्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत. वर्ष २०२२ पर्यंत भारतात बँकिंग, वित्तपुरवठा सेवा आणि विमा क्षेत्रात सुमारे १६ लाख अतिरिक्त कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. विमा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या मुद्द्यावर दै. दिव्य मराठीने बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर रुबेन सेल्वाडारई यांच्याशी बातचीत केली.
 

> सध्या विमा क्षेत्रात युवकांसाठी कोणत्या प्रकारचा रोजगार उपलब्ध आहे? 
भारतात इन्शुरन्स पेनिट्रशेन खूप कमी आहे. म्हणजे खूप कमी लोक विमा उतरवतात. त्यामुळे आमच्याकडे विस्ताराच्या खूप संधी आहेत. यात विमा सल्लागाराची सर्वात मोठी भूमिका आहे. ते लोकांना विम्याबाबत जागरूक करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. याव्यतिरिक्त मारिकेटिंग, ब्रँडिंग, लीगल, अकाउंट, बॅक ऑफिसचे काम इ.मध्ये विमा क्षेत्रात नोकऱ्या आहेत.

> तुमच्या बजाज अलियांझ कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक आहे? 
आम्ही नोकरीवर घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांबाबत विचार करतो. चेंज मॅनेजमेंट, नवोन्मेष,ग्राहकानुकूल, आंत्रप्रेन्योरशिप, क्षमतावृद्धी अशी अनेक कौशल्ये उमेदवारांत शोधत असतो. 

> वेगवेगळ्या पदांवर तुमच्या कंपनीला कुठल्या योग्यतेच्या व्यक्तीची आवश्यकता आहे?
विमा व्यवसायात वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्यासाठी आम्हाला पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आणि एमबीएपासून सुपर स्पेशालिस्ट आणि फंक्शनल सर्टिफिकेशन्सपर्यंत शैक्षणिक अर्हतेची आवश्यकता असते.


> विमा क्षेत्रात नोकरी मिळण्याच्या किती शक्यता आहेत आणि  भविष्यातील चित्र कसे अस
ेल?
विमा क्षेत्रात वृद्धी आणि विस्ताराच्या भरपूर संधी आहेत. येत्या काळात रेग्युलेटरी बदल, डिजिटलायझेशन आणि विम्याचे नवे प्रॉडक्ट येण्यामुळे विमा कवच क्षेत्र व्यापक आणखी होईल.

> मुलाखतीची तयारी कशी करावी? 
मला वाटते की, मुलाखत घेणारा उमेदवाराचे विचार आणि अभिव्यक्तीची स्पष्टता या गोष्टी पाहतो. कुठल्याही गोष्टीला जाणून घेण्याची उत्सुकता आणि प्रामाणिकपणा हेही प्रमुख गुण आहेत. नवीन गोष्टी आजमावण्यासाठी तो किती तत्पर आहे, हे आंत्रप्रेन्योरशिपसाठी आवश्यक आहे. नोकरी देताना उमेदवाराची व्यवस्थापकीय क्षमता, काम समजून घेण्याची व करण्याची सखोलता, प्रयोगात्मक बुद्धिमत्ता व यश मिळवण्याची आतुरता असे गुणही पारखले जातात. समस्येच्या निराकरणाची पद्धत व प्रकल्प सादरीकरणाची क्षमता हेही गुण नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक आहेत.

> सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटामुळे विमा क्षेत्रात कोणते बदल होत आहेत? 
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बिग डेटा आणि यांत्रिकी शिकवण यामुळे आता उमेदवाराच्या योग्यतेत बदल होत आहेत.  ज्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य किंवा तज्ज्ञता असेल अशा लोकांना कंपन्या त्वरित नोकरी देतील. नवीन काही करणे आणि व्यवस्थेच्या विचारधारेबद्दलचा दृष्टिकोन हेही योग्यतेच्या रूपात उमेदवाराकडून मागितले जाईल.

> गेल्या काही वर्षांत विमा कंपन्यांत उमेदवार निवड प्रक्रियेत काही बदल झाला आहे का?
नवीन तंत्रज्ञानामुळे उमेदवार निवड प्रक्रियेेतही बदल झाला आहे. उमेदवारापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही नवीन स्रोत, चॅनल मिक्स आणि सोशल मीडियाचाही वापर करत आहोत. त्यामुळे पूर्वीच्या उमेदवार निवड प्रक्रियेत आता बदल झाला आहे.

> सध्या विमा क्षेत्रात कोणत्या नोकऱ्या उपलब्ध होतात? आगामी काळात कोणते बदल होतील?
ग्राफिक्स आणि युजर इंटरफेस, ग्राहककेंद्रित आणि वर्तणूक विज्ञान, जटिल समस्या सोडवणे आणि विश्लेषणाची क्षमता, डिजिटलीकरण आणि  भविष्यातील तांत्रिक विकास या क्षेत्रांत नोकरीच्या जास्त संधी आहेत. हायटेक/ रोबोटिक एन्व्हायर्नमेंेट आणि वर्कफोर्स मॅनेजमेंट हेही आगामी काळात करिअरचे पर्याय असतील.  तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच या पदांवरील व्यक्तींच्या काम करण्याच्या पद्धतीतही बदल होईल. याचा कंपन्यांना फायदा होईल.
 

विमा क्षेत्राची ३-५ वर्षांत १२-१५% वाढ होणे शक्य
> बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुपच्या अहवालानुसार विमा उद्योगाचे प्रीमियम उत्पन्न २०२० पर्यंत वाढून ३५,०००-४०,००० कोटी रुपयांपर्यंत जाईल.
> सध्या देशात ५३ विमा कंपन्या आहेत. यातील २४ जीवन विमा आणि इतर २९ जनरल इन्शुरन्स कंपन्या आहेत.
> विम्याचे देशाच्या आर्थिक वृद्धिदरात (जीडीपी) ३.४४% चे योगदान आहे.
> गत आर्थिक वर्षात एकूण विम्यात जीवन विम्याचा ५५.६ टक्के वाटा होता. इर्डाच्या २०१५-१६ च्या अहवालानुसार जीवन विमा क्षेत्रात जगभरातील ८८ देशांत भारत १० व्या स्थानी आहे.
> आरोग्य विमा क्षेत्रात २०१५-१६ या वर्षादरम्यान २१.७ टक्के वाढ झाली होती.
> आयबीआएफनुसार विमा क्षेत्रात ३ ते ५ वर्षांत १२-१५ टक्के वाढीची शक्यता आहे.
 

विमा क्षेत्रात येथे आहेत संधी
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अँड असिस्टंट
डेव्हलपमेंट ऑफिसर
इन्शुरन्स एजंट
इन्शुरन्स सर्व्हेअर
अॅक्चुरी
रिस्क मॅनेजर 
रिस्क अँड इन्शरन्स मॅनेजमेंट
क्लेम अॅडजस्टर
क्लेम क्लर्क
कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह
लॉस कंट्रोल स्पेशालिस्ट
सेल्स एजंट
इन्शुरन्स अंडररायटर
ऑफिस मॅनेजर
रिस्क कन्सल्टंट
बॅक ऑफिस वर्क इ.
 

 

बातम्या आणखी आहेत...