आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Indian Oil recruitment 2019: इंडियन ऑईलमध्ये निघाली भरती, नाही द्यावी लागणार लेखी परीक्षा, इंटरव्ह्यूच्या आधारे होईल सलेक्शन, 17 लाख रूपयांचे मिळेल वार्षीक पॅकेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- इंडियन ऑईल(Indian Oil)ने अनेक पदांच्या भरतीची जाहिरात जारी केली आहे. इंडियन ऑईलची ऑफिशिअल वेबसाइट iocl.com ने सांगितल्याप्रमाणे इंजीनिअर अधिकारी, अनुसंधान अधिकारी आणि सहायक अधिकारीच्या पदासाठी ही भर्ती काढली आहे. विशेष बाब म्हणजे कँडिडेटचे सलेक्शन GATE 2019 मिळालेल्या मार्काच्या आधारे केले जाईळ. म्हणजेच यासाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्ष देण्याची गरज नाहीये. अप्लाय करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2019 आहे.

 


17 लाख रूपयांचे पॅकेज
इंडियन ऑईल ग्रॅजुएट आणि पोस्‍ट ग्रॅजुएट पदासाठी वर्षाकाठी 17 लाखांचे पॅकेज देत आहे. तर पोस्‍ट ग्रॅजुएट केमिस्‍ट्री पदासाठी 14 लाख रूपयांचे पॅकेज देत आहे.

 


एजुकेशनल क्वालिफिकेशन

इंजीनिअर ऑफिसर पदासाठी इंजीनिअरिंग डिग्री सिव्हील, केमिकल, इलेक्ट्रिकल, इंस्‍ट्रूमेंटल आणि मेकॅनिकल इंजीनिअरिंगमध्ये ग्रॅजुएट असणे गरजेचे आहे. रिसर्च ऑफिसर पदासाठी पोस्‍ट ग्रॅजुएट इंजीनिअर डिग्री असणे आवश्यक आहे. असिस्‍टंट ऑफिसरच्या पदासाठी केमिस्‍ट्रीमध्ये पोस्‍ट ग्रॅजुएट आणि दोन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.

 


अर्ज करण्याची प्रोसेस
इंडियन ऑईलच्या ऑफिशिअल वेबसाइट iocl.com वर जा. येथे होम पेजवर ‘Careers’ सेक्‍शनमध्ये ‘latest job openings’ वर क्‍ल‍िक करा. आता ‘application for engineers/officer/research… through GATE 2019’ लिंकवर क्‍ल‍िक करा. एक नवीन पेज ओपन होईल, त्यावर क्लिक करून ‘apply online’ वर क्‍ल‍िक करा. फॉर्म भरा आणि ‘save and next’ वर क्‍ल‍िक करा.

बातम्या आणखी आहेत...