आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jobs Related To Science, Technology, Engineering And Mathematics Increased By 44% In 3 Years; The Latest Report Released By The Indeed Website

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताशी संबंधित नोकऱ्यात ३ वर्षांत ४४% पर्यंत वाढ; इनडीड वेबसाइटने जारी केला ताजा अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २०१६ पासून आतापर्यंत २०१९ पर्यंतच्या नोकऱ्यांवर अहवाल तयार
  • ३१% नोकऱ्यासह दिल्ली सर्वात पुढे

नवी दिल्ली - देशात वाढणारे रोजगार संकट आणि विज्ञान विषयांकडे तरुणाईचे घटलेले आकर्षण पाहता विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित(एसटीईएम) विषयाशी संबंधित दिलासादायक वृत्त आले आहे. नोव्हेंबर २०१६ पासून नोव्हेंबर २०१९ दरम्यान देशात या विषयाशी संबंधित नोकऱ्यात ४४ टक्क्यांची वृद्धी झाली. जॉब सर्च साइट इनडीडने आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध डेटाच्या आधारे हा अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार एसटीईएम विषयांशी संबंधित नोकऱ्यांकडे तरुणाईचे आकर्षण जास्त आहे. गेल्या तीन वर्षांत या क्षेत्रात नोकऱ्यांची मागणी वाढली आहे. नोव्हेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान या क्षेत्रात नोकऱ्या ५ टक्क्यांनी वाढल्या. जास्त मागणी डेव्हलपरची आहे. या क्षेत्रात टॉप पाच मागणीच्या पदात सॉफ्टवेअर इंजिनिअर, पीएचपी डेव्हलपर, डॉटनेट डेव्हलपर, अँड्राॅइड डेव्हलपर व फूल स्टेक डेव्हलपर आहेत.


इनडीड इंडियाचे अभियांत्रिकी प्रमुख आणि साइट संचालक व्यंकट माचवारापू म्हणाले, गेल्या तीन वर्षांदरम्यान एसटीईएम क्षेत्रांत नोकऱ्या वाढत आहेत. या क्षेत्रासाठी एक चांगला संकेत म्हणजे नोकऱ्या शोधणाऱ्या या क्षेत्रात आवड दिसून येत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अनेक 
क्षेत्र उदाहरण द्यावयाचे झाल्यास रोबोटिक्स, इंटरनेट आॅफ थिंग्ज वाढल्यामुळे रोजगाराची मागणी वाढली आहे.३१% नोकऱ्यासह दिल्ली सर्वात पुढे

अहवालानुसार, एसटीईएम विषयांशी संबंधित नोकरी देण्यात दिल्ली एकूण नोकऱ्यांत ३१% देऊन सर्वात पुढे आहे. यानंतर मुंबई(२१%), बंगळुरू(१४%), पुणे(१२%), हैदराबाद(१२%) आणि चेन्नई(१०%) यांचा क्रमांक लागतो. मात्र, क्षेत्रवार पाहिल्यास ३४% पोस्टिंगसह पाश्चिमात्य क्षेत्र सर्वात पुढे आहे. यानंतर ३१% पोस्टिंगसह उत्तर व दक्षिण क्षेत्राचे स्थान आहे. पूर्व क्षेत्रात या विषयाशी संबंधित ४% पोस्टिंग झाल्या.