आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jodhapur Accident | Trolla Goes On Bolero, 11 Including 6 Women Killed, 3 Injured

रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील 11 लोकांचा मृत्यू; जीव गमावलेल्या जोडप्याचे 16 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॉले आणि बोलेरोत भीषण धडक, 11 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर
  • बोलेरोतील लोक बालोतराहून रामदेवराच्या दर्शनासाठी जात होते

जोधपूर - राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रॉले आणि बोलेरोच्या धडकेत एकाच कुटुंबातील 11 लोकांची मृत्यू झाला तर 3 जण गंभीररित्या जखमी आहेत. शेरगड भागात हा अपघात झाला. धडकेनंतर बोलेरो कार ट्रॉलेच्या खाली दबली होती. हे कुटुंब नवविवाहित जोडप्याला बालोतराहून रामदेवरा दर्शनासाठी घेऊन जात होते. या जोडप्याचे लग्न 16 दिवसांपूर्वी 27 फेब्रवारी रोजी झाले होते. 
मृतांमध्ये 4 पुरुष, 6 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. या सर्वांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. तर जखमींना जोधपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोलिस काय म्हणाले?

पोलिसांनुसार, "शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मेगा हायवे सोइंतरातील गंवारिया हॉटेलजवळ हा अपघात झाला. शेरगड पोलिसांनी क्रेनच्या साहायाने ट्रॉलेला हटवले. त्यानंतर बोलेरोत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. बालोतराजवळील कानोना गावातील विक्रम आणि सीता यांचा 27 फेब्रवारी रोजी लग्न झाले होते. हे कुटुंब रामदेवरा मंदिरात दर्शनासाठी जात होते."