आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वेळा बॅटरी बदलूनही रेल्वेचा एसी बंदच, प्रवासी भडकले, तीन अधिकाऱ्यांंना ५४ किमी सोबतच नेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - जोधपूर ते बंगळुरू जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेचा एसी शनिवारी बिघडला. दोन वेळा बॅटरी बदलूनही एसी सुरू न झाल्याने प्रवासी संतापले. त्यांनी गांेधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांना त्याच रेल्वेतून सुरत ते वलसाडपर्यंत ५४ किमी प्रवास करावा लागला. कोच थंड झाला तेव्हाच प्रवाशांनी अधिकाऱ्यांना सोडले. 
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बी-२ व बी-३ कोचमधील एसी राजस्थानातील फालना स्थानकापासून बिघडला होता. बडोद्यात बॅटरी बदलण्यात आली. सुरत स्थानक आल्यानंतर कुलिंग सुरू न झाल्याने प्रवासी गुदमरून गेेले. तेव्हा प्रवाशांनी गांेधळ घालण्यास सुरुवात केली. सुरतचे स्थानक प्रमुख सी. आर. गरुडा, मुख्य वाणिज्य निरीक्षक गणेश जाधव, स्टेशन सुपरिटेंडंट सी. एम. खटीक व आरपीएफचे एसआयएपीएफ यांना बी-२ कोचमधून प्रवाशांसाेबत बसावे लागले. 

 

अधिकाऱ्यांना रेल्वेत सोबत चलण्याची प्रवाशांची मागणी

प्रवाशांनी सांगितले, सुरत स्थानकावर पुन्हा बॅटरी बदलण्यात आली. अधिकारी म्हणाले, रेल्वे सुरू होताच कुलिंग सुरू होईल. पण प्रवाशांचा विश्वास बसेना. अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत काही वेळ प्रवास करावा, असा आग्रह धरला. रेल्वे नवसारीला पोहोचली तेव्हा एसी सुरू होता. प्रवाशांनी त्यांना आणखी एक स्टेशनपर्यंत चलण्याचा आग्रह धरला होता. 

बातम्या आणखी आहेत...