आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jodhpur Lectures On Drug Addiction In Night Worship, Smuggling Of Opiate marijuana As Soon As Opportunity Arises

रात्री भजनात नशामुक्तीवर द्यायचा प्रवचन, संधी मिळताच करायचा अफू - गांजाची तस्करी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भजन करताना गाेवर्धन राम विष्णोई  -फाइल फोटो, सोमवारी पोलिसांच्या ताब्यात असलेला विष्णोई - Divya Marathi
भजन करताना गाेवर्धन राम विष्णोई -फाइल फोटो, सोमवारी पोलिसांच्या ताब्यात असलेला विष्णोई

जोधपुर - रात्रीच्या सुमारास भजन गाऊन लोकांना नशामुक्ती व पर्यावरण संरक्षणावर प्रवचन देणारा भजन गायक तस्कर निघाला. जोधपूर ग्रामीण पोलिसांनी सोमवारी  नांदिया प्रभावती येथील गोवर्धन राम विष्णोई यास २२० किलो अफू व गांजासह अटक केली. तेव्हा लोकांना धक्काच बसला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राहुल बारहठ यांनी सांगितले बावडी येथून सेवकी खुर्दला जाणाऱ्या रस्त्यावर खेडापा पोलिस ठाण्याच्या पथकाने विष्णोईला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असताना तेथे त्याला १० डिसेंबरपर्यंत पेालिस कोठडी सुनावण्यात आली. गोवर्धन याने गेल्या सहा महिन्यापूर्वीच एसयूव्ही विकत घेतली होती. त्यातून तो अफू व गांजा घेऊन जात होता. २ वर्षांपासून करायचा तस्करी

भजन कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर गाेवर्धनने दोन वर्षांपासून तस्करी सुरू केली होती. सोमवारी तो रावेर की ढाणी येथे एका कुटुुंबाकडून आयोजित भजनसंध्येला हजर राहण्यासाठी जाणार होता. तत्पूर्वीच तो पकडला गेला. अफू व गांजाचा पुरवठा तो अन्य लहान तस्करांना करत होता. पोलिस आता त्या तस्करांचा शोध घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...