आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनाम्यासाठी न्यायालयात आले: पत्नीची अट- आई-वडिलांना भेटायला नाही जायचं, बहिण आली तरी तिला बाहेर भेटायचं, नंतर झाले असे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपुर(राजस्थान)- राष्ट्रीय लोक न्यायालयात घटस्फोटासाठी आलेल्या नवरा-बायकोमध्ये वाद इतका वाढला की, रागात आलेल्या बायकोने नवऱ्याची चप्पलने धुलाई केली. मोठ्या मुश्किलीने लोकांनी आणि पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवले. नंतर नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथे तिला जामीनावर सोडण्यात आले.


खेडापा निवासी संतोषचे लग्न प्रकाशसोबत वर्ष 2011 मध्ये झाला होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतरच त्या दोघांत वाद होणे सुरू झाले. वाद घटस्फोटापर्यंत गेला आणि 2013 मध्ये जोधपूरच्या फॅमिली कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला. मागच्या काही दिवसांपासून ते पुन्हा सोबत राहण्याचा विचार करत होते. काही दिवस ते दोघे अहमदाबादमध्ये सोबत राहिले, आणि दोघांनी संगनमताने कोर्टातील अर्ज वापस घेण्याचा विचार केला. यासाठी ते दोघे न्यायालयात गेले होते आणि जज प्रदीप कुमार जैन आणि सदस्य अधिवक्ता मनोज गहलोत यांच्या बँचसमोर त्यांची काउंसलिंग झाली, आणि सोबत राहण्याचे ठरले.


पत्नीची अट- आई-वडिलांना भेटायला नाही जायचं, बहिण आली तरी तिला बाहेर भेटायचं
जेव्हा शेवटचा आदेश लिहण्याची वेळ आली तेव्हा पत्नीने काही गोष्टी अॅड करायला सांगितल्या, म्हणजे माझ्यासोबत राहत असताना आई-वडिलांना नाही भेटायचे. बहिण आली तर बाहेर भेटायचं, तिला घरात घ्यायच नाही. मेंटेनंसचे पैसे दिले जावेत. बँचने या सगळ्या अटी लिहीण्यास नकार दिला, आणि त्यांच्यात राजीनामा नाही होऊ शकला. त्यानंतर ते दोघे बाहेर आले, आणि वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की, पत्नीने चप्पल काढली आणि पतीला मारणे सुरू केले. त्यानंतर उपस्थित लोकांनी आणि पोलिसांनी त्यांना सोडवले आणि पोलिस ठाण्यात घेऊन गेले. नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीआरपीसी कलम 151 अंतर्गत बायकोला अटक केले आणि न्यायालयात सादर केले, नंतर तिला जामीनावर सोडण्यात आले.
 
 

 

बातम्या आणखी आहेत...