आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोहरीच बीसीसीआयची घटना पायदळी तुडवताय!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकाच्या निवडीच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे रागावलेल्या प्रशासक मंडळाच्या सदस्या डायना एडुलजी यांनी आता पुन्हा एकदा सीईओ राहुल जोहरी यांच्यावर तोफ डागली आहे. निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहून जोहरी यांनी बीसीसीआयच्या घटनेचा भंग केला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला ताेंड फुटण्याचे चित्र अाहे. याकडेच सर्वांचे लक्ष लागले अाहे. गत काही दिवसांपासून या प्रकरणावर जाेरदार चर्चा आहे. 

 

क्रिकेटविषयक कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे सीईओचे काम नाही. जोहरी यांनी निवड समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहिल्यानंतर ती चूक झाकण्यासाठी ‘मयंक अगरवाल’च्या व्हिसाचे कारण पुढे केले अाणि यादरम्यान आपले आणखी हसू करून घेतले आहे. याचीही खमंग चर्चा आहे. 

 

जोहरी यांनी बीसीसीआयच्या घटनेचा आणि सीईओ म्हणून केलेल्या कर्मचारी कराराचाही भंग केल्याचा आरोप डायना एडुलजी यांनी केला आहे. यामुळे आता हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विनोद राय आणि बीसीसीआयचे सदस्य तसेच जोहरी यांनाही पत्राद्वारे कळवले आहे.  


जोहरी यांची आपली चूक लपवण्याची केविलवाणी धडपडही त्यांनी उघड केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार, क्रिकेटशी संबंधित कोणत्याही निर्णय प्रक्रियेत किंवा बैठकीमध्ये सीईओचा संबंध असता कामा नये.  बैठकीला आपण मयंक अगरवाल यांच्या ऑस्ट्रेलियाच्या व्हिसाशी संबंधित कामासंदर्भात उपस्थित असल्याचे जोहरी यांनी म्हटले होते. यावरून अाता या वादाकडे सर्वांची नजर लागली आहे.