आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्कः 1999 मध्ये रिलीज झालेल्या 'सरफरोश' या आमिर खान स्टारर चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये जॉन अब्राहमला घेण्यात आले होते, पण आता जॉनने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. स्क्रिप्ट त्याला आवडली होती. गेल्या वर्षी या चित्रपटासाठी त्याच्याशी संपर्क साधला होता. परंतु पाइपलाइनमधील बऱ्याच चित्रपटांमुळे त्याला या चित्रपटासाठी तारखा काढता आल्या नाहीत. त्याच्या वतीने प्रयत्नदेखील सुरू होते. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथनने तेव्हापासून आतापर्यंत जॉनची वाट पाहिली. शेवटी दोघांमध्ये काही जमले नाही.
जॉनने दिव्य मराठीसोबत चर्चा केली, तो म्हणाला, माझ्याकडे सध्या बरेच काम आहे. त्यामुळे त्यांना मला तारखा देता आल्या नाहीत. मला आधी ते प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहेत. दुसरीकडे त्या दिग्दर्शकांना खूपच घाई आहे, त्यामुळे तो चित्रपट करू शकलो नाही.
दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन यांनी आमच्यात काही बिनसले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, जॉनने जे सांगितले तेच खरे कारण होते. तथापि जॉनची जागा कोण घेणार या प्रश्नावर त्यांनी काही सांगितले नाही. मात्र जाॅनच्या जागी कोणीतरी नवीन हीरो किंवा आमिरलाच घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, स्टुडिओच्या बळावर दिग्दर्शक आमिर खानबरोबर मीटिंग करू शकतात, असे व्यापार अभ्यासकांचे मत आहे. तथापि, 'सरफरोश 2' ची कथा पहिल्या भागाच्या 20 वर्षांपुढची आहे. काळ पुढे सरकल्यामुळे आमिरच्या व्यक्तिरेखेला डीजीपी म्हणून दाखवावे लागले असते, असे मत दिग्दर्शकाने मांडले. अजयसिंग राठोड या व्यक्तिरेखेच्या कुटुंबाला परत आणणे कठीण झाले असते. त्यामुळे गेल्या वर्षी जॉनला या स्क्रिप्टमध्ये घेण्यात आले होते. यात त्याला पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत घेतले होते.
या प्रोजेक्टला एका कॉर्पोरेट स्टुडिओचे सहकार्य आहे. त्यामुळे जॉनच्या जागी चांगल्याच अभिनेत्याला घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. निर्माते हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत सुरू करू इच्छित आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.