आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने केले आहेत 50 पेक्षा जास्त चित्रपट, तरीही पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात जॉनचे पालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: जॉन अब्राहमचा मोस्टअवेटेड चित्रपट 'सत्यमेव जयते' 15 ऑगस्टला रिलीज झाला. हा चित्रपट भ्रष्टाचाराविरुध्द लढणा-या एका युवकाची कथा आहे. यामध्ये जॉन एका सीरियल किलरच्या भूमिकेत दिसतोय. दोन महिन्यांपुर्वी जॉनचा 'परमाणु' चित्रपट सुपरहिट ठरला आहे. आजच्या तारखेला जॉन हा फिल्म इंडस्ट्रीमधील मोठ्या अॅक्टर्समधून एक आहे. एका मोठ्या अभिनेत्याचे आई-वडील असूनही त्याचे आई-वडील खुप सिंपल आहेत. जॉनचे वडील आजही कुठे जाताना बसचा वापर करतात. तर त्याची आई ऑटोने प्रवास करते. 


स्टारडम म्हणजे काळ्या काचांच्या कारमध्ये फिरणे नव्हे
2016 मध्ये जॉनने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, "मी खुप साध्या कुटूंबातून आहे. मी स्वतःच खुप सिंपल आहे. माझे को-स्टार नेहमीच म्हणत असतात की, तु कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनमध्ये शूज का घालत नाही, तर मी त्यांना म्हणतो की, मला चप्पलमध्ये राहणे जास्त आवडते. मला माझ्या मीडल क्लास व्हॅल्यू माहिती आहेत आणि तोच माझा प्लस पॉइंट आहे. जॉननुसार, 'माझे वडील आजही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात आणि आई ऑटोचा वापर करते.' स्टारडमचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही काळ्या काचांच्या कारमध्ये फिरावे आणि बॉडीगार्डसोबत राहावे"

 

अवॉर्ड शोमध्ये जात नाही जॉन
मला अवॉर्ड शोमध्ये जाणे आवडत नाही. तसेच लग्नात डान्स आणि ग्रँड पार्टीपासून मी दूर राहतो. जास्तीत जास्त अवॉर्ड फंक्शन टीआरपीसाठी असतात, जे फिक्स असतात. अवॉर्ड फंक्शनवर मला विश्वास नाही आणि हे एखाद्या सर्कस शोप्रमाणे आहे. एकदा मला सांगण्यात आले की, मी एक अवॉर्ड जिंकलो आहे. परंतू तरीही मी तिथे गेलो नाही. नंतर माझा अवॉर्ड दुस-या कुणालातरी देण्यात आला. 


सिल्वेस्टर स्टेलॉनकडून इंस्पायर होऊन बनवली बॉडी 
जॉन जेव्हा 22 वर्षांचा होता तेव्हा त्याने हॉलिवूड स्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा 'रॉकी 4' पाहिला. जॉन यावेळी खुप इंस्पायर झाला आणि त्याने स्वतःला फिट ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर तो मॉडलिंग करु लागला आणि 1999 मध्ये ग्लँडरेग्स मॅनहंट कॉन्टेस्ट जिंकला. यानंतर त्याला अनेक जाहिराती आणि म्यूझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. नंतर त्याने मुंबईच्या किशोर नामित कपूर स्कूलमधून अॅक्टिंग शिकली. 2003 मध्ये त्याने 'जिस्म' चित्रपटातून डेब्यू केला. 

 

बातम्या आणखी आहेत...