आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: जॉनचा \'सत्यमेव जयते\' म्हणजे जुन्या बाटलीत नवी दारु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट सत्यमेव जयते
स्टार 1.5/5
कलाकार   जॉन अब्राहम, मनोज बाजपेयी, आएशा शर्मा, अमृता खानविलकर
दिग्दर्शक  मिलाप झवेरी
संगीतकार  साजिद वाजिद, तनिष्क बागची, रोचक कोहली आणि अर्को  पार्वो
श्रेणी ड्रामा 

 

 

'सत्यमेव जयते' हा चित्रपट भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात देण्यात आलेल्या लढ्यावर आधारित आहे. मिलाप झवेरी यांच्या या चित्रपटात पोलिस फोर्समधील करप्शनवर भाष्य करण्यात आले आहे. वीर (जॉन अब्राहम) एक आर्टिस्ट आहे, पण सोबतच तो एक किलरसुद्धा आहे. भ्रष्ट पोलिसांना तो जाळून मारतो आणि मेल्यानंतर त्यांचे स्केच बनवतो. जेव्हा पोलिस फोर्स त्याला पकडण्यात अपयशी ठरतं, तेव्हा या प्रकरणाच्या चौकशीसाठी इन्स्पेक्टर शिवांश (मनोज बाजपेयी) ची नियुक्ती केली जाते. शिवांश किलर वीरला पकडण्याचा प्रयत्न करत असतो, पण वीर पोलिसांना मारण्याचा क्रम सुरु ठेवतो. वीर किलर का बनतो, हेदेखील या कथेत दाखवण्यात आले आहे. 

 

खरं तर वीरचा उद्देश पोलिस डिपार्टमेंट असलेल्या भ्रष्ट पोलिस अधिका-यांना पोलिस फोर्समधून बाहेर काढण्याचा आहे. डीसीपी शिवांश राठौर एक प्रामाणिक पोलिस ऑफिसर आहे, जो किलरच्या डोक्यात सुरु असलेल्या योजनेपर्यंत पोहोचतो. पण यानंतर काय घडायला हवे, हे लिहायला कदाचित स्क्रिप्टराइटर विसरले. या चित्रपटाची उणीव हीच आहे. दमदार सुरुवात झाल्यानंतर एका वळणावर चित्रपट भरकटत जातो. 

 

चित्रपटाचा विषय जुना आहे, हे सहज प्रेक्षकांच्या लक्षात येतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि विषयात दम नाही. दिग्दर्शन आणि पटकथा मिलाप झवेरी यांचीच आहे. त्यांच्या सिग्नेचर डायलॉगने चित्रपटाला हास्यास्पद बनवले आहे. गंभीर दृश्यातदेखील चित्रपटाचे संवाद फनी वाटतात. चित्रपटाच्या विषयाकडे गांभीर्याने बघणे प्रेक्षकांसाठी अशक्य बाब आहे. 

 

जॉन अब्राहमने नेहमीप्रमाणेच आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याच्या अभिनयाचा दिग्दर्शकाला फायदा करुन घेता आलेला नाही. किलिंगपासून रोमान्सपर्यंत त्याचे एक्सप्रेशन्स सारखेच आहेत. फक्त पंच मारताना तो अभिनय करतोय, असे वाटते. मिलाप झवेरी यांनी हीरोईन शिखा (आएशा शर्मा) ला जगातील सर्वात चांगल्या तरुणीच्या रुपात सादर केले आहे. ती प्राण्यांची काळजी घेते. समुद्र किना-यांवर स्वच्छता राखते, एनजीओच्या मुलांना शिकवते आणि सोबतच पेटिंगदेखील करते. आएशा शर्माने तिच्या वाट्याला आलेली भूमिका योग्यरित्या साकारली आहे. मनोज बाजपेयीचेही काम उत्तम झाले आहे. शिवांशच्या पत्नीच्या भूमिकेत अमृता खानविकरची भूमिका अतिशय लहान आहे. चित्रपटात नोरा फतेहीचा आयटम नंबर 'दिलबर दिलबर' लक्ष वेधून घेतो. याशिवाय  आतिफ असलमचा 'पानियों सा' हा देखील चांगला ट्रॅक आहे. इतर गाणी ठिकठाक झाली आहेत. म्युझिक डायरेक्शन साजिद वाजिद, तनिष्क बागची, रोचक कोहली आणि अर्को पार्वो यांचे आहे.  

 

हा चित्रपट बघून आपला वेळ आणि पैसा व्यर्थ घालवू नका. 

बातम्या आणखी आहेत...