आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणांमुळे जॉन अब्राहमच्या \'सत्यमेव जयते\'ला मिळाले ए सर्टिफिकेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: जॉन अब्राहम आणि मनोज वायपेचीया 'सत्यमेव जयते' चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होतोय. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला एक सर्टिफेकट दिले आहे. चित्रपटाला 'अॅडल्ट' ठरवण्यात आले आहे. हा चित्रपट भ्रष्टाचारावर प्रकाश टाकतो. यामध्ये हिंसाचार आणि भडक दृष्ये आहेत. यासोबतच यामध्ये भडक भाषेचा वापर करण्यात आल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. चित्रपट दिग्दर्शक मिलाप जवेरी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, या चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळेल असे वाटतच होते. कारण या चित्रपटात सामान्य अॅक्शन सीन्स नाही. चित्रपटातील मोहरमच्या एक दृश्य जास्त भडक आहे. चित्रपटातमध्ये अश्लिल दृष्य आणि शब्द नाहीत. फक्त यामधील भडक दृष्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  


या चित्रपटात जॉन अब्राहम एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मनोजनेही पोलिस अधिका-याचीच भूमिका साकारली आहे. मात्र जॉन भ्रष्टाचाराविरोधात आपल्या पद्धतीने लढा देतो. अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आयशा शर्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.

 


खरे तर ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटावर एक वेबसीरिज बनवण्याचा प्लान मिलाप यांनी केला होता. परंतु  दिग्दर्शक रेंजिल डिसिल्व्हा यांनी ही कथा ऐकल्यानंतर यावर वेवसीरिज नाही तर चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला. यानंतर मिलाप यांनी चित्रपटावर काम सुरू केले. पण त्यांच्यापुढे एक अडचण होती. याआधी आलेले मिलाप यांचे सिनेमे बॉक्सऑफिसवर आपटल्याने कुणीही बडा स्टार त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. यानंतर मिलाप यांनी वरूण धवनचा भाऊ आणि निर्माता रोहित धवन याच्यासोबत आपली ही अडचण शेअर केली. रोहित यानेच या चित्रपटासाठी जॉनचे नाव सुचवले. एक तर जॉन या चित्रपटाच्या कथेत एकदम फिट बसणार होता. शिवाय केवळ दिग्दर्शकाचा मागचा चित्रपट आपटला म्हणून त्याचा चित्रपट न स्वीकारण्याचा जॉनचा स्वभाव नव्हता. मिलाप यांनी जॉनला चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली आणि जॉन लगेच या चित्रपटासाठी तयार झाला.

 

बातम्या आणखी आहेत...