आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • John Is Just Doing Comedy In 'Pagalpanti' Following In The Footsteps Of Nana Patekar And Ajay Devgan.

​​​​​​​ नाना पाटेकर आणि अजय देवगणच्या पावलावर पाऊल ठेवत 'पागलपंती'मध्ये जॉन करतोय फक्त कॉमेडी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'रॉ' आणि 'बाटला हाउस' सारखे प्रचंड हाणामारीवर आधारित चित्रपट केल्यानंतर जॉन अब्राहमची इमेज प्रेक्षकांमध्ये अॅक्शन हीरोची झाली आहे. मात्र आता तो आपली ही प्रतिमा पणाला लावत आहे. म्हणजेच तो आगामी 'पागलपंती' मध्ये विनोद करताना दिसणार आहे. याआधीदेखील त्याने अनीस बज्मीच्या 'वेलकम बॅक' मध्येदेखील कॉमेडी केली होती. मात्र तेथे त्याचे पात्र अॅक्शन करतानाही दिसले होते. मात्र या चित्रपटात तो एका लाचार व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अॅक्शन नावाला दिसणार आहे. पूर्ण चित्रपट विनोदी आहे. त्यामुळे जॉनने 'पागलपंती' चित्रपटातून आपल्या अॅक्शन इमेजची रिस्क घेतली आहे.

काय असते रिस्क घेणे...
जेव्हा एखाद्या नायकाची अॅक्शन इमेज प्रेक्षकांच्या मनात सेट होते तेव्हा ते बऱ्याचदा लाचार किंवा गरीब व्यक्तीच्या भूमिकेत नायकाला स्वीकारत नाहीत. 'ट्यूबलाइट' चित्रपटात सलमान खानसोबतदेखील असेच काहीसे घडले होते. मात्र, दुसरीकडे 'प्यार तो होना ही था' च्या वेळी अजय देवगणने जेव्हा ही जोखीम घेतली तेव्हा त्याला काही अडचण आली नाही. या चित्रपटापासून प्रेक्षकांनी त्याची अ‍ॅक्शन प्रतिमा विसरत त्याला रॉम-कॉममध्ये स्वीकारले. आता जॉनच्या कॉमेडीवर प्रेक्षक आपला जीव ओवाळून टाकतात की त्याला नापसंती देतात, हे पाहण्याजोगे राहील.

याविषयी चित्रपटाचा दिग्दर्शक अनीस बज्मी म्हणतात...,
चित्रपटात जॉनची जी भूमिका आहे, ती त्याने आजपर्यंत कधीही साकारलेली नाही. या चित्रपटातून, तो गरीब आणि भेकड व्यक्तीची भूमिका करत आहे. कारण त्याच्या पात्रावर साडेसाती सुरू आहे. खरंतर, मी सतत वेगळे काहीतरी करण्यावर विश्वास ठेवतो. 'वेलकम' करण्यापूर्वी नाना पाटेकरांना कॉमेडी अवतारात कुणीही पाहिले नव्हते, पण 'वेलकम' च्या भूमिकेनंतर नानाची प्रतिमा पूर्णपणे बदलली. मला आशा आहे की, जॉनदेखील या चित्रपटापासून आपली वेगळी प्रतिमा तयार करण्यात यशस्वी होईल. खरं तर, त्याने 'गरम मसाला', 'देसी बॉइज' आणि 'दोस्ताना' सारख्या चित्रपटात कॉमेडी करताना दिसला होता. तरीदेखील लोकांनी त्याला फुल फ्लेज्ड कॉमेडी चित्रपट ऑफर केला नाही.

अजयला आधी केली होती विचारणा...
या चित्रपटाचे नाव आधी 'साढे साती' होते. मात्र हे टायटल निर्मात्यांना नकारात्मक वाटले, त्यामुळे त्यांनी ते बदलण्याचा निर्णय घेतला. ते टायटल बदलून 'पागलपंती' ठेवले. चित्रपटासाठी आधी अजय देवगणला विचारणा केली होती, मात्र तारखा नसल्याने त्याने काम करण्यास नकार दिला.