सेलेब लाइफ / जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या भांडणाचा ऑडियो व्हायरल, ट्विटरवर ट्रेंड करू लागले #justiceforjohnnydepp

ऑडियो व्हायरल होताच सोशल मीडियावर जस्टिस फॉर जॉनी डेप ट्रेंड करू लागले आहे

दिव्य मराठी वेब टीम

Feb 03,2020 05:41:50 PM IST

बॉलिवूड डेस्क : सुपरस्टार जॉनी डेप आणि एम्बर हर्ड सुमारे चार वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. पण पुन्हा एकदा दोन्ही स्टार्सचे नाते मीडियाच्या चर्चेचा विषय बनले आहेत. एका व्हायरल ऑडियोमध्ये एम्बर यावर सहमती दर्शवत आहेत की, तिने जॉनीला मारले होते. ऑडियो व्हायरल होताच सोशल मीडियावर जस्टिस फॉर जॉनी डेप ट्रेंड करू लागले आहे.

व्हायरल होत असलेल्या ऑडिओमध्ये दोन्ही स्टार्स त्यांच्यात झालेल्या मारहाणीबद्दल बोलत आहेत. तसेच एम्बर हे मान्य करत आहे की, तिने जॉनीला मारले होते. एम्बर ‘एक्वामॅन’, ‘नेव्हर बँक डाउन’ यांसारख्या चित्रपटात दिसली आहे तर जॉनी डेप ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ सारख्या हिट सीरीजचा भाग होता.


दोन्ही स्टार्सने 2015 मध्ये लग्न केले होते. पण केवळ 18 महिन्यानंतरच दोघांचा घटस्फोट झाला होता. अभिनेत्रीने 2016 मध्ये जॉनीवर ड्रग्स घेऊन मारहाण केल्याचा आरोप केला होता. जॉनीनेदेखील एम्बरवर छळ केल्याचे आरोप केले होते. इंग्रजी वेबसाइट स्पॉटबॉयनुसार, अभिनेत्याने ऑगस्ट 2018 मध्ये खुलासा केला होता की, एम्बरने कशाप्रकारे सूडाच्या भावनेने त्याच्या बिछान्यावर घाण केली होती.

X