आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: आलिशान घरात राहतात जॉनी लिव्हर, या कारणाने 'हे' घर कधीही सोडण्यास होत नाहीये तयार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता जॉनी लिव्हर यांनी आज वयाची 61 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 ऑगस्ट, 1957 साली आंध्र प्रदेशातील कनिगीरी येथे तेलुगु ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरातील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही आणि शाळेत असतानाच त्यांनी शाळा सोडली. आंध्र प्रदेशात केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेऊन जॉनी लीव्हर मुंबईत आले होते. पत्नी सुजाता, मुलगी जिमी आणि मुलगा जैसी असे त्यांचे कुटुंब मुंबईतील अंधेरी (वेस्ट) येथे 3BHK अपार्टमेंटमध्ये राहतात. जॉनी लिव्हर यांनी 1990 मध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता.

 

- मुंबईत जॉनी यांची आणखी घरे आहेत, मात्र या घरासोबत त्यांचे भावनिक नाते जुळले आहे. 1990 मध्ये त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता. 

 

- divyamarathi.com सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये जॉनी यांची मुलगी जिमीने सांगेतिले, 'पप्पांनी हे घर 90s मध्ये स्वतःच्या पैशाने खरेदी केले होते. या घरासोबत त्यांच्या अनेक आठवणी आहे. त्यामुळे हे घर सोडून ते दुसरीकेड जाण्यास तयार होत नाही. माझ्या भावाचा जन्म झाल्याबरोबर आम्ही येथे शिफ्ट झाला होतो. आमचे कुटुंब फार मोठे होते, आम्ही सर्वजण येथे राहात होतो. आता सर्वजण आपापल्या घरांमध्ये शिफ्ट झाले आहेत, मात्र पप्पांसाठी हे घर नेहमीच खास राहिले आहे.'


जिमीने भारतीय चित्रपट रसिकांच्या घरात घर करुन राहिलेल्या जॉनी लिव्हरच्या घराचे काही खास फोटोज् आमच्यासोबत शेअर केले, पुढील स्लाइडमध्ये पाहा 

Exclusive Photos

बातम्या आणखी आहेत...