आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन्सन अँड जॉन्सनला 4 हजार कोटी रुपयांचा दंड; कंपनीने ड्रग्जचे हाेणारे दुष्परिणाम लपवले : काेर्ट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओक्लाहोमा सिटी - जॉन्सन अँड जॉन्सन या औषधी कंपनीवर अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील एका न्यायालयाने ओपिऑइड संकटात सापडल्याने ५७.२ कोटी डॉलर (सुमारे ४ हजार कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. कंपनीने या निर्णयास वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. अमेरिकेत ओपिऑइड संकट प्रकरणात अनेक खटले सुरू आहेत. ओक्लाहोमा येथेही २ हजार खटले दाखल झाले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सचा खटला सर्वप्रथम सुरू झाला. ओपिऑइडचा वापर वेदनाशामक औषधांत केला जातो. १९९९ ते २०१७ पर्यंत अमेरिकेत या औषधांच्या अतिसेवनाने ४ लाख लोक दगावले आहेत. एकट्या ओक्लाहोमा शहरात २००० नंतर ओपिऑइड अतिसेवनाने ६ हजार नागरिक मृत्यू पावले आहेत. 


घातक सवय : अाेपिअाॅइड ड्रग्ज घेणारे २९ % रुग्ण बरे झाल्यानंतरही त्याचा वापर करणे सुरूच ठेवतात 
संकट टाळण्यासाठी १.२ लाख कोटी रुपयाची
गरज 
या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाने म्हटले, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी दोषी आहे. कंपनीने ओपिऑइड ड्रग्जमुळे हाेणारे दुष्परिणाम लपवले. यापासून होणारे फायदे मात्र जाहिरातीतून अवास्तव रंगवून सांगितले. ओकलाहोमा प्रशासनाने या प्रकरणाची सुनावणीच्या प्रारंभीच म्हटले, ओेपिऑयडच्या व्यसनापासून लोकांची सुटका करणे, कायदेशीर प्रकरणाची फी व अन्य खर्च मिळून औषधी कंपनीवर १७०० कोटी डॉलरची (सुमारे १.२ लाख कोटी रुपये) गरज आहे. 

न्यायाधीश म्हणाले, जॉन्सनच्या जाहिराती खोट्या व धोकादायक 
न्या. ठाड बाकमॅन यांनी सुनावणीदरम्यान जॉन्सन अँड जॉन्सनवर अनेक ताशेरे ओढले. फॅमिली फ्रंेडली व मुलांसाठी साबण, तेल व पावडर तयार करणाऱ्या कंपनीबाबत ते म्हणाले, कंपनीचे मार्केटिंग कॅम्पेन खोटे, दिशाभूल करणारे व धोकादायक होते. यामुळे ड्रग्जचे व्यसन लागले. 

ओपिऑइड संकटाची सूत्रधार जॉन्सन अँड जॉन्सन : वकील 
आेक्लाहोमा राज्याचे वकील ब्रॅड बेकवर्थ यांनी कंपनी ओपिऑइड संकटाची सूत्रधार असल्याचे म्हटले. अशी औषधे विकून २० वर्षांत अब्जावधी डॉलरची कमाई केली. ओपिऑइड तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांवरही आमची कारवाई सुरू राहणार आहे. त्यांनाही मोठा दंड होईल. 

भारतवंशीय औषधी व्यावसायिक जॉन कपूरही दोषी
बोस्टन येथील एका न्यायालयाने अमेरिकी ओपिऑइड संकटाशी संबंधित प्रकरणात भारतवंशीय औषधी व्यावसायिक जॉन कपूर यास याच वर्षी मे महिन्यात दोषी ठरवले होते. या प्रकरणी दोषी सिद्ध झालेले एखाद्या औषधी कंपनीचे ते पहिले बॉस होते. रुग्णांना गरज नसतानाही ओपिऑइड ड्रग्ज लिहून देण्यासाठी ते डॉक्टरांना लाच देत असत. त्यांच्यावर विमा कंपन्यांनाही अंधारात ठेवल्याचा आरोप होता. 

हेराॅइनचे सेवन करणारे ८०% लोक ओपिऑयड वापरत असत 
- वेदनाशामक म्हणून ओपिऑयड दिले जाते. यापैकी २१ ते २९% लोक गैरवापर करतात. 
- ओपिऑइडचे ड्रग्जचे सेवन करणारे ६% लाेक पुढे हेराॅइनचे सेवन करतात 
- हेरॉइनचे सेवन करणारे ८०% लाेक व्यसन म्हणून ओपिऑइड ड्रग्ज पासूनच सुरुवात करतात. 
- अमेरिकेत ४५ राज्यांत २०१६ ते १७ दरम्यान ओपिऑइड ओव्हरडोस ३० % वाढले.