आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Joining America War On Terror After 9 11 Is Pakistan's Biggest Mistake, Says Imran Khan

9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सोबत राहणे ही पाकिस्तानची सर्वात मोठी चूक- इम्रान खान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी म्हटले की, "पाकने 9/11 हल्ल्यानंतर अमेरीकेच्या सोबत राहून सर्वात मोठी चूक केली. त्यांनी जनरल परवेज मुशर्रफ यांच्या अमेरिकेला साथ देण्याच्या निर्णयाचा दाखला देत म्हटले की, मागच्या सरकारने असे निर्णय घ्यायला नको होते, जे ते पूर्ण करू शकत नव्हते."
इम्रान खान पुढे म्हणाले की, "दहशतवादाविरुद्ध अमेरिकेकडून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत 70 हजार पाकिस्तानी मारले गेले आहेत. असे असूनही, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेला विजय न मिळाल्याने, त्यांनी आम्हालाच जबाबदार ठरवले. 1980 च्या दशकात तत्कालीन सोवियत संघाशी लढण्यासाठी अनेक समूहांना प्रशिक्षण देण्यात आले. पण, नंतर जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानात लढण्यासाठी आले, तेव्हा त्याच समूहांना दहशतवादी घोषित केले."

‘अफगाणिस्तानात शांती स्थापनेसाठी ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार’
इम्रान खान म्हणाले की, "अफगाणिस्तानमध्ये लष्कर हे समाधान नाहीये. आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना परत एकदा अफगाणिस्तान सोबत चर्चा करण्यास सांगू. जर तुम्ही 19 वर्षे यशस्वी होऊ शकला नाहीत, तर आणखी 19 वर्षेही यशस्वी होऊ शकणार नाहीत."