Home | Divya Marathi Special | joint-family-lieve-happly

एकाच कुटुंबात नांदते सुख, समृद्धी आणि २३ माणसं

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क - जशपूरनगर | Update - May 25, 2011, 12:01 PM IST

एकाच छताखाली चार पिढ्यांचा संसार, संपूर्ण कुटुंबात २३ लोक.. सर्वात मोठे कुटुंबप्रमुख ८६ वर्षांचे. सण-उत्सव, सुख-दु:ख सगळं काही वाटून घ्यायचं. एकच चूल. एकच अंगण. बहुतेक कर्ते पुरुष एकाच व्यवसायात. एेकायला नवल वाटेल, पण जशपूरनगरमधील हे कुटुंब कित्येक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहते.

 • joint-family-lieve-happly

  एकाच छताखाली चार पिढ्यांचा संसार, संपूर्ण कुटुंबात २३ लोक.. सर्वात मोठे कुटुंबप्रमुख ८६ वर्षांचे. सण-उत्सव, सुख-दु:ख सगळं काही वाटून घ्यायचं. एकच चूल. एकच अंगण. बहुतेक कर्ते पुरुष एकाच व्यवसायात. एेकायला नवल वाटेल, पण जशपूरनगरमधील हे कुटुंब कित्येक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहते.

  देशभरात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहत असताना कुटुंबप्रमुख नेमिचंद जैन यांनी चार पिढ्यांचं कुटुंब जीवापाड जपलंय. त्यांचा चौथा मुलगा सुबोध यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन कुटुंब मूळ राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातलं. ६ वर्षांपूर्वी वडील नेमिचंद व्यवसायासाठी सन्नामध्ये आले आणि त्यांनी किराणा दुकान सुरू केलं. त्यानंतर त्यांची मुले अनिल, सुनील, सुशील, शोभा यांचा जन्मही इथेच झाला. ओढवलेल्या परिस्थितीवर मात करत नेमिचंद यांनी कुटुंबाचा योग्य सांभाळ केला. नेमिचंद यांची मुलंच नाही, तर नातवंडंही याच व्यवसायात यशस्वी झाली आहेत. घरातलं मॅनेजमेंटही त्यांनी व्यवस्थित सांभाळलं आहे. हे कुटुंब पाहिलं की तुलसीदासांचं एक वाक्य आठवतं- 'मुखिया मुख सो चाहिये खान-पान को एक, पाले- पोसे सकल अंग तुलसी सहित विवेक। जिथे घरातला कुटुंबप्रमुख समजूतदार असेल तिथे समृद्धी आणि सौख्य नांदते.

  त्याग आणि प्रेम- कुटुंबाचा आधार
  जैन कुटुंबीयांच्या मते मोठ्यांविषयी आदर, मोठ्यांमध्ये त्यागाची भावना आणि लहानांवर प्रेम करण्याची भावना असेल तर एकत्र कुटुंबात यापेक्षा मोठे सुख नसते. मोठ्या कुटुंबात ब:याच वेळा तणावही निर्माण होतो, पण कुटुंबातले मोठे या समस्येवर उपाय शोधून काढतात. त्यामुळे परिवार एकाच धाग्यात बांधला जातो.

  एकच चूल ऐश्वर्याचे प्रतीक
  जैन परिवारातल्या मोठ्या सूनबाई मीना जैन यांच्या म्हणण्यानुसार, एकच चूल ऐश्वर्याचे प्रतीक आहे.प्रत्येकाची आवड वेगळी असते, पण घरातल्या सर्व महिला मिळून-मिसळून स्वयंपाकघर चालवतात. प्रत्येकाला आपापल्या वेळेत जेवण मिळते. जेवणात लहान मुलांकडे विशेष लक्ष दिले जाते.

Trending