आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Joint Press Conference Of Chief Minister And Uddhav Thackeray, Formal Announcement Of Mahayuti

दोन दिवसात बंडोबा थंड : मुख्यमंत्री फडणवीस; युतीत लहान- माेठा कुणी नाही : उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘जागा वाटप झाल्यानंतर बंडखोरी झाली असून काही जणांनी उमेदवारी अर्जही भरलेले आहेत. मात्र दोन दिवसात बंडखोरांचे बंड थंड करून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगू. जर बंडखोरांनी ऐकले नाही तर महायुतीत त्यांना स्थान नसेल आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘युतीत लहान भाऊ, मोठा भाऊ असे काही नसून भावाचे नाते टिकवणे महत्वाचे आहे,’ असे सांगत जागावाटपावरून सुरु असलेल्या चर्चेलापूर्ण विराम दिला. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप-शिवसेना आणि अन्य घटक पक्षांच्या महायुतीची घोषणा केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘शिवसेना आणि भाजपचे नेते या महायुतीच्या परिषदेला उपस्थित आहेत. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने घटक पक्षाचे नेते उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु यापुढे आम्ही सर्व एकत्र दिसू. लोकसभा निवडणुकीआधी आम्ही युती केली. दोन पक्ष असल्याने विषयांवर मतभिन्नता असू शकते परंतु हिंदुत्वाच्या धाग्याने आम्ही जोडले गेलो आहोत. व्यापक वैचारिक भूमिका घेऊन जागा वाटप केलेले आहे, काही ठिकाणी तडजोड करावी लागली असून या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने निवडून येईल.’ मुख्यमंत्री बोलत असतानाच आदित्य ठाकरे यांनी मंचावर प्रवेश केला. त्यांच्याकडे बघून मुख्यमंत्री म्हणाले, आदित्य मुंबईत सर्वाधिक मतांनी निवडून येणार असून विधानसभेत दिसणार आहेत. मी त्यांचे स्वागत करीत आहे.’ 

  • मुख्यमंत्रीपदाची इच्छा गैर नाही : उद्धव

शिवसेनेला कमी जागा मिळाल्या का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही मनपापासून युती केली असून पुढील गोष्टी आरामात बसून करता येतात. तुझे माझे करत राहाण्यापेक्षा आम्ही महाराष्ट्राचा विचार करून युती केली आहे. दोन्ही पक्ष समजूतदार आहेत. आदित्य मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा असेल तर ती गैर नाही. आदित्य प्रथमच सक्रिय राजकारणात पाऊल टाकत आहे. त्यामुळे ही चर्चा करण्यापेक्षा त्याचे स्वप्न महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणे हे आहे.’

  • तावडे, बावनकुळेंवर इतर जबाबदारी

विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित या नेत्यांना उमेदवारी न दिल्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, कोणाचीही तिकिटे कापली नसून त्यांच्यावर दुसरी जबाबदारी देण्यात येणार आहे. काही नवीन चेहरे विधिमंडळात येतील तर काही पक्षाच्या कामात सहभागी होतील. पक्षात कार्यकर्त्यांच्या भूमिका बदलत असतात. पक्षात बाहेरून आलेल्यांनाच तिकीटे दिली नाहीत तर मूळ, निष्ठावंतांनाच जास्त तिकिटे दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • कणकवलीचा तिढा सोडवू

कणकवलीत भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली. त्यावरून दोन्ही पक्ष आमने-सामने उभे असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही आमनेसामने असलो तरी येथे बाजूबाजूला बसलो आहेत. त्यामुळे त्याची चिंता नसावी.