आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jolted Lover Shot Dead Gf In Hotel Samrat Then Shoot Himself, Admitted To Hospital In Critical Condition

हॉटेलच्या रुममध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडले युगूल, 4 वर्षांपासून सुरु होते अफेअर, एका कारणांमुळे दोघांनी उचलले हे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीतामढी(बिहार)| सम्राट हॉटेल येथे प्रियकराने प्रेयसीच्या कानामागे गोळी मारत तिची हत्या केली. नंतर स्वतःवर गोळी झाडली. पोलिसांनी प्रेमिकेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. गंभीर अवस्थेत त्या प्रियकराला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी जखमी व्यक्तीला पीएमसीएस येथे हलवले. मृत मुलगी मेहसौल ओपी क्षेत्रातील राजोपट्टी येथील पूजा असल्याचे समोर आले आहे. तर त्या जखमी तरुणाचे नाव सूरज आहे असे कळतेय. खोलीची तपासणी केल्यानंतर तिथे पोलिसांना एक पिस्तूल आणि एक काडतूस सापडले आहे. खोलीमधील दृष्य पाहून पोलिसांही चकीत झाले. बेडवर एक तरुणी मृत अवस्थेत पडलेली होती. तिच्या उजव्या कानामागे गोळी लागली होती. तर तरुण बेडवर वेदनांनी व्हिवळत होता. त्याच्याही उजव्या कानामागे गोळी लागलेली होती.

 

वडिलांनी सांगितले की, कोचिंगला जाण्याच्या बहाण्याने घरातून निघाला होता सूरज 
सूरजचे वडील इंद्रदेव यादव यांनी सांगितले की, सूरज सर्वात धाकटा मुलगा आहे. तो बीए फायनल ईयरचा विद्यार्थी होता. सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारात तो रोजच्या प्रमाणे कोचिंगसाठी निघाला होता. तो रोज 11 वाजता परत यायचा. उशीर झाल्यामुळे त्याला कॉल केला. पण मोबाइल बंद येत होता. मुखिया मदन रायने जवळपास एक वाजता घटनेची सूचना दिली. यानंतर धावतपळत मी हॉस्पिटलमध्ये गेलो.

 

तीन वर्षांपुर्वी दोघं घरातून पळाले होते, कुटूंबियांनी पुन्हा परत बोलालवे 
12 डिसेंबर रोजी समस्तीपुर येथील एका मुलासोबत पूजाचा साखरपुडा झाला होता. पूजा-सूरज चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तीन वर्षांपुर्वी दोघं घरातून पळून गेले होते. कुटूंबियांनी त्यांना परत बोलावले होते. यानंतर कुटूंबियांनी दोघांना वेगळे होण्यास सांगितले होते. पण दोघांच्या भेटीगाठी बंद झाल्या नाही. दोघांची जात वेगळी असल्यामुळे कुटूंबांचा लग्नाला विरोध होता. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर हॉटेल संचालकने दोघ एकत्र हॉटेलमध्ये आल्याचे स्वीकारले आहे. पण मुलीचा फोटो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नाही.

 

9.30 वाजता बाइकने मित्रासोबत हॉटेलमध्ये पोहोचला होता सूरज 
हॉटेल संचालक सुजीत कुमारने पोलिसांना सांगितले की, सोमवारी सकाळी जवळपास साडे नऊ वाजता सूरज आपल्या एका मित्रासोबत बाइकने हॉटेलमध्ये आला होता. आयडी जमा केल्यानंतर त्याला तिस-या मजल्यावर 302 नंबरची खोली मिळाली. सूजरने मित्राला बाइक परत करुन घरी पाठवून दिले.

 

खोली उघडली नाही यानंतर 12.30 वाजता पोलिसांना सूचना दिली 
सुजीतने सांगितले की, साडे बारा वाजता वेटर खोलीमध्ये काहीतरी सामान देण्यासाठी गेला. आवाज देऊनही खोली उघडली नाही. खोली उघडावी यासाठी त्यांना खुप आवाज देण्यात आले. आतून उत्तर न मिळाल्यामुळे त्यांना संशय आला. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. 

 

जखमीची परिस्थिती गंभीर : डॉक्टर 
जखमीवर उपचार करणारे डॉ. वरुण कुमारने सांगितले की, सूरजच्या उजव्या कानामागून गोळी निघून दूसरीकडून निघाली. व्हेनमध्ये गोळी लागली आहे. परिस्थिती खुप नाजूक आहे. काहीच करणे शक्य नाही. गंभीर स्थिती पाहून त्याला पटना येथे हलवण्यात आले आहे. 

 

तरुणाकडे पिस्तूल कुठून आले, याचा तपास सुरु आहे: पोलिस 
शशी भूषण सिंह म्हणाले की, तरुणाजवळ पिस्तूल कुठून आले, याचा तपास केला जात आहे. प्रार्थमिक आणि पोस्टमार्टम प्रक्रिया केली जात आहे. घटनेच्या कारणाचा खुलासा झालेला नाही. कुटूंबियांना विचारपूस केली जात आहे. 

 

मुलगी हॉटेलमध्ये कशी पोहोचली, सस्पेंस कायम 
हॉटेल संचालक आणि सीसीटीव्ही फुजेजमध्ये मुलगा एकटाच हॉटेलमध्ये आला होता. मुलगी खोलीमध्ये कधी आणि कशी पोहोचली, याचा सस्पेंस कायम आहे. मुलीला हॉटेलमध्ये येताना कुणीही पाहिले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्येही मुलगी दिसत नाही. पोलिस हॉटेल संचाकलांना कठोर पध्दतीने विचारपूस करत आहे. शशी भूषण सिंह म्हणाले की, प्राथमिक आणि पोस्टमार्टम प्रक्रिया सुरु आहे. फॉरेंसिक टीमला सूचना देण्यात आल्या आहेत. पण घटनेच्या कारणांचा खुलासा झालेला नाही.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...