Home | International | Other Country | joseph-yun-will-meet-su-kee

म्यानमारमध्ये राजकीय बदलाचे संकेत

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 03:21 PM IST

अमेरिकेचे राजदूत जोसेफ युन यांनी आंग सान सू की यांची आज भेट घेतली

  • joseph-yun-will-meet-su-kee

    यांगोन - अमेरिकेचे राजदूत जोसेफ युन यांनी आपल्या म्यानमार भेटीमध्ये लोकशाही नेत्या आंग सान सू की यांची आज भेट घेतली. या भेटीत देशात लोकशाही रूजवीण्यासंबंधी अमेरिकेचा सू की यांना पाठींबा असल्याचे अमेरिकेतर्फे सांगण्यात आले.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनाने म्यानमारमध्ये लोकशाही पद्धतीने सरकार निवडले जावे अशी भूमिका घेतली होती. शिवाय जनतेचा वाढता दबाव पाहून तेथे निवडणूकाही घेतल्या गेल्या होत्या. मात्र सैन्यदलाने त्यात फसवेगीरी करून व जनतेवर दबाव टाकून सरकार काबीज केले होते. त्यामुळै लोकाशाहीसाठी आग्रही असलेल्या ६५ वर्षीय आंग सान सू की यांच्या समर्थकांची आग अजूनही धगधगत आहे. त्यामुळे लोकशाहीची पाळेमुळे म्यानमारमध्ये रूजविण्याची हीच योग्य संधी असल्याचे अमेरिकेच्या मुत्सद्यांचे मत आहे. सू की यांची तेथील लष्करशाहीने दोन दशकांपासून राजकीय स्थानबद्धता केली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये तीची सुटका केली गेली होती.

Trending