आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Journalist Adarsh Mishra Died After Falling From The Terrace In Goregaon Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात की घातपात? 7 व्या मजल्यावरून पडून पत्रकाराचा मृत्यू, टेरेसवर गेले होते मॉर्निंग वॉकला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पत्रकार दिनी मुंबईत एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आदर्श मिश्रा असे मृत पत्रकाराचे नाव होते. आदर्श मिश्रा हे गोरेगाव येथे सातव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. मुंबईतील प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रकामध्ये आदर्श हे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत होते.  हा अपघात आहे की घातपात, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, आदर्श मिश्रा हे गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये कुटुंबासोबतच राहत होते. मिश्रा हे नेहमी प्रमाणे इमारतीच्या टेरेसवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. अचानक ते सातव्या मजल्यावरून खाली पडले. त्यांना तातडीने जवळच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. आदर्श मिश्राच्या मृत्युविषयी घातपात व्यक्त करण्‍यात येत आहे. पोलिसांनी त्याच्या मृत्यूचे कारण अपघाती निधन असे नमूद केले आहे.

 

कोण होते  आदर्श मिश्रा?

आदर्श मिश्रा हे मागील 18 वर्षांपासून पत्रकारिता करत होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी वृत्तपत्राच्या व्हाईस प्रेसिडेंटपदाचा राजीनामा दिला होता.  विवा इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च' या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. आदर्श नेहमीप्रकाणे गोरेगाव येथील राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवर मॉर्निग वॉकसाठी गेले होते. अचानक ते टेरेसवरून खाली कोसळले.