आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dev Anand 95th Birth Anniversary Special Journalist Dharmendra Pratap Singh Revealed About Dev Anand

Remembrance:देव आनंद म्हणाले होते, 'चार्जशीट हिट करा नाही तर मी मरुन जाईल', वाचा त्यांचे न ऐकलेले किस्से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देव आनंद यांच्या अभिनयाची खास शैली असो किंवा त्यांच्या फिमेल फॅन्स. देव आनंद इतरांपेक्षा नेहमीच वेगळे होते. बॉलिवूडमध्ये कित्येक हिरो आले आणि गेले, पण काही मोजकेच असे अॅक्टर्स आहेत, ज्यांचा उल्लेख केला नाही तर हिंदी चित्रपटांचा इतिहास अर्धवट राहील. देव आनंदही अशाच हिरोंपैकी एक होते. 26 सप्टेंबर रोजी देव साहेबांचा वाढदिवस आहे. ते जर आज आपल्यात असते तर त्यांनी वयाची 95 वर्षे पूर्ण केली असती.

 

देव साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पत्रकार धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी त्यांच्याशी संबंधित सांगितलेले काही मजेशीर किस्से आपण जाणून घेणार आोहत.


'सेन्सर'ची पार्टी.. 
धर्मेंद्र प्रताप सिंह सांगतात, काही वर्षांपूर्वी हॉटेल लीलामध्ये 'सेन्सर' चित्रपटाच्या पार्टीत त्यांच्याशी माझी भेट झाली होती, तेव्हा तिथे शेकडो पाहुण्यांमध्ये देव आनंद लहान मुलांप्रमाणे उड्या मारत होते. हेमा मालिनी, राज बब्बर, अमरीश पुरी, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्‌टी, ममता कुलकर्णी, आयेशा जुल्का, पूजा बत्रा हेही त्याठिकाणी होते. पण जेव्हा देव आनंद स्टेजवर पोहोचले तेव्हा सगळे त्यांनाच पाहत राहिले. 15-20 मिनिटांच्या स्पीचमध्ये ते एक मिनिटभरही एका ठिकाणी थांबले नाहीत, सारखे इकडे तिकडे फिरत होते.

 

हॉटेल ताजमध्ये झाली होती पुढची भेट..
धर्मेंद्र सांगतात की, ताज हॉटेलमध्ये आयोजित 'मि. प्राइम मिनिस्टर'च्या पार्टीत त्यांनी माझ्या हातातील पेन आणि कागद घेऊन बाजुला ठेवले आणि म्हणाले आज आपण फक्त एन्जॉय करणार आहोत. बोलायचे असेल तर पुन्हा कधी तरी माझ्या पेंट हाऊसवर या. देव साहेबांचा मुलगा सुनील तेव्हा एका कोपऱ्यात शांतपणे उभा होता. तर देव साहेब स्वतः जाऊन सगळ्यांची भेट घेत होते. तो एक सुंदर अनुभव होता. मला तेव्हा प्रथमच जाणवले की, त्यांचा हात हा अगदी एखाद्या लहान मुलीप्रमाणे कोमल होता.

 

'चार्जशीट'मध्ये बिझी होते देव आनंद... 

एका भेटीबाबत बोलताना धर्मेंद्र सांगतात की, मृत्यूच्या अडीच महिन्यांपूर्वी त्यांनी मला खारमधील 'सिद्धी' इमारतीतील त्यांच्या भेटीच्या ठिकाणी बोलावले होते. तेव्हा ते 'चार्जशीट'च्या रिलीजमध्ये व्यस्त होते. मी वॉचमनशी बोलत होतो, तेव्हाच आवाज आला, 'हां, आ जाइए... आपका ही वेट कर रहे है' हा आवाज होता, सुनील आनंद यांचा. त्यांनी देव साहेबांची परवानगी घेऊन मला आत जाण्याचा इशारा केला. याठिकाणी असलेले दृश्य चित्रपटांविषयीचे प्रेम सांगण्यास पुरेसे होते. नव्या जुन्या चित्रपटांचे कट-आऊट आणि होर्डींग्स मध्ये एक टेबल आणि त्यावर अनेक फाईल आणि रिळचे डबे होते. त्याच्यामागे एका शानदार चेअरला पाठ टेकवून देव साहेब बसले होते. ते थकलेले वाटत होते. त्यानंतर बोलायला सुरुवात झाली, 'चार्जशीट' पासून सुरू झालेला प्रवास सुरैया आणि विजय आनंद यांच्या चित्रपटांपर्यंत पोहोचला. 'मेरा गोल्डी बहुत जल्दी चला गया', असे लहान भावासाठी अगदी सहजपणे बोलले. त्याशिवाय इतर चित्रपटांची चर्चा केली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर लहान मुलांप्रमाणे उत्साह दिसला. 

 

बोलता-बोलता विसरत होते.. 
धर्मेंद्र सांगतात की, देव आनंद बोलता-बोलता काही तरी विसरत आहेत हे माझ्या लक्षात आले. ते मुद्यांवरूनही भरकटत होते. मी त्यांना पूर्वी कधीही असे पाहिले नव्हते. त्यांच्यावर वयाचा परिणाम होत होता. निघालो तेव्हा म्हणाले, तुम्हाला वाटेल तेव्हा भेटायला नक्की या. ते म्हणाले, हा चित्रपट (चार्जशीट) हिट करा. जर तसे झाले नाही तर मी मरुनच जाईल. तसे पाहिले तर देव साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विरुद्ध हे वक्तव्य होते. पण 2010 मध्ये 3 डिसेंबरच्या सकाळी देव साहेबांच्या निधनाची बातमी येताच, त्यांचे शब्द माझ्या कानात फिरायला लागले. कारण ते खरंच म्हणाले होते. 

बातम्या आणखी आहेत...