maharashtra politics / 'अनेकदा पत्रकार बातमीच्या नादात नेत्यांना वैतागून सोडतात पण त्यावरुन ट्रोल करणं मुर्खपणाचं'- सत्यजित तांबे

प्रश्न विचारल्याने पत्रकार परिषदेत शरद पवार चिडले

दिव्य मराठी वेब

Aug 31,2019 11:08:51 PM IST

मुंबई- शरद पवार सहसा कधीच कोणावर चिडलेले पाहायला मिळत नाहीत. पत्रकारांनाही ते नेहमी त्यांच्या वेगळ्या शैलीत उत्तर देत असतात. पण शिर्डीत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार चांगलेच भडकले. या पत्रकाराला आता राष्ट्रवादीकडून ट्रोल केले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या पत्रकारावर वैयक्तिक टीका केली आहे. यानंतर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्या पत्रकाराची पाठराखण करत ट्रोल करणे मूर्खपणाचे असल्याचे म्हटले.

"मी स्वत: हरीष दिमोटेला मागील 15-17 वर्षे बघतो आहे. हरीष सारखे अनेक पत्रकार हलाखीच्या जीवनातून संघर्ष करत प्रगती करणारे आहेत. स्वत:ची गाडी घेतली व त्यात कुणी मोठा माणूस बसला की कौतुकाने आपण फोटो काढतो. लगेच त्याला ट्रोल करणे म्हणजे मुर्खपणाच ! अनेकदा पत्रकार बातमीच्या नादात नेत्यांना वैतागून सोडतात, पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाने एकदा 'हा विषय घेऊ नका' सांगितल्यावर हरीषने थांबायला पाहीजे होते हे बरोबर, मात्र त्यामुळे त्याला अशा पद्धतीने ट्रोल करणे चुकीचे आहे. ही माझी भूमिका आहे", असे ट्वीट सत्यजित तांबे यांनी केले.

यापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी या पत्रकारावर टीका केली होती. "पवार साहेबांना प्रश्न विचारणारे नि:पक्षपाती पत्रकार श्रीरामपूरचे हरीश दिमोटेजी विखेंच्या गाडीवर पार्टटाइम ड्रायव्हर म्हणून रोजी रोटी कमावतात, पत्रकारिता हा त्यांचा छंद आहे," अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी वैयक्तिक टीका केली होती. यानंतर सत्यजित तांबे यांनी कुणाचंही नाव न घेता अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.

X
COMMENT