आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलवामा Terror Attack: पुण्यात काश्मीरी पत्रकारावर हल्ला..पोलिसांकडून संशयिताला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी तरुणांना टार्गेट केले जात आहेत. पुण्यात शुक्रवारी रात्री इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकारावर काही लोकांनी हल्ला केला. पत्रकाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, पत्रकार जिबरान नझीर यांच्या काही तरुणांनी हल्ला केला. तुला काश्मीरमध्ये परत पाठवू, अशी धमकीही दिली. पुण्यातील टिळक रोडवर रात्री ही घटना घडली.

 

दरम्यान, यवतमाळमध्ये शिक्षणासाठी अालेल्या काही काश्मीर विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे समोर आले होते.
बातम्या आणखी आहेत...