Home | News | Journalist's team boycott Kangana's film, so producer ekta kapoor apologies for the incident

पत्रकारांशी झालेल्या वादानंतर पत्रकार संघाने केला कंगनाच्या चित्रपटाचा बहिष्कार, तर एकताने लिखित स्वरूपात मागितली माफी 

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 10, 2019, 04:49 PM IST

'आमचा उद्देश कुणाचाही अपमान करण्याचा नव्हता' - एकता कपूर 

 • Journalist's team boycott Kangana's film, so producer ekta kapoor apologies for the incident

  बॉलिवूड डेस्क : काही दिवसांपूर्वी चित्रपट 'जजमेंटल है क्या' चे 'द वखरा सॉन्ग' च्या लॉन्चिंग इव्हेन्टमध्ये कंगना रनोट पत्रकार जस्टिन राववर भडकली होती. तिच्या अशा वर्तनामुळे पत्रकार संघ (एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया) नाराज आहे आणि तिने माफी मागावी अशी मागणी करत आहे. संघाने कंगनाला बॉयकॉट करण्याची घोषणा करत एकता कपूरला याबद्दल एक पात्र लिहिले होते. याच पार्श्वभूमीवर आता एकताची फिल्म प्रोडक्शन कंपनी बालाजी टेलीफिल्म्सकडून एक अधिकृत वक्तव्य करून माफी मागितली गेली आणि घटनेबद्दल दुःख वयात केले गेले.

  पत्रकारांशी वाद घालणे कंगनाला पडले महागात, 'जजमेंटल है क्या' ला नाही मिळणार कोणतेही मीडिया कव्हरेज

  हे आहे एकताचे स्टेटमेंट...
  बालाजी टेलीफिल्म्सच्या स्टेटमेंटमध्ये लिहिले गेले आहे की, "संबंधित लोकांसाठी 7 जुलै 2019 ला सॉन्ग लॉन्च इव्हेंटमध्ये 'जजमेंटल है क्या' ची अभिनेत्री आणि पत्रकार जस्टिन राव यांच्यामध्ये झालेल्या वादाबद्दल खूप काही लिहिले जात आहे. दुर्दैवाने घटनेने खूप चुकीचे वळण घेतले आहे. यामध्ये सहभागी असलेल्या लोकांनी निष्पक्षपणे आपापला दृष्टिकोन सर्वांसमोर मांडला. पण हे आमच्या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये झाले. त्यामुळे प्रोड्यूसर असल्याच्या नात्याने आम्ही माफी मागू इच्छितो आणि या अप्रिय घटनेबद्दल दुःख व्यक्त करत आहोत.

  'आमचा उद्देश कुणाचाही अपमान करण्याचा नव्हता...'
  स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिले गेले आहे की, "आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, हमारा हेतू कुणाचाही अपमान करण्याचा किंवा कुणालाही दुखावण्याचा नव्हता. आमचा चित्रपट 'जजमेंटल है क्या' 26 जुलैला रिलीज होत आहे आणि आम्ही मीडियाला आग्रह करतो की, या एक घटनेमुळे चित्रपटाच्या टीमची मेहनत खराब होऊ देऊ नका."

 • Journalist's team boycott Kangana's film, so producer ekta kapoor apologies for the incident
 • Journalist's team boycott Kangana's film, so producer ekta kapoor apologies for the incident
 • Journalist's team boycott Kangana's film, so producer ekta kapoor apologies for the incident

Trending