Home | Gossip | Journey from Great Kali to The Great Khali is going to show on the silver screen, script is ready

सिल्वर स्क्रीनवर दिसेल ग्रेट कालीपासून द ग्रेट खली बनण्यापर्यंतचा प्रवास, स्क्रिप्ट झाले आहे तयार

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 23, 2019, 01:33 PM IST

पंजाब पोलीस जॉइन केल्यानंतर बदलले नशीब

 • Journey from Great Kali to The Great Khali is going to show on the silver screen, script is ready

  एंटरटेन्मेंट डेस्क : डब्ल्यूडब्ल्यूई हेव्ही वेट चॅम्पियन राहिलेला दिलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खलीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आता सिल्वर स्क्रीन वर देखील दिसणार आहे. बायोपिकसाठी फॉक्स स्टार प्रोडक्शन हाउसने खलीला साइन केले आहे. स्क्रिप्टदेखील तयार आहे. यामध्ये त्याच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसापासून ते डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये देशाचे नाव उंचावण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. फॉक्स स्टारने अभिनेत्याच्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आहे. जो खलीची भूमिका प्रामाणिकपणे सिल्वर स्क्रीनवर साकारू शकेल.

  खली एकुलता एक भारतीय रेसलर आहे, ज्याने परदेशात जाऊन मोठमोठ्या दिग्गज रेसलरना हरवून डब्ल्यूडब्ल्यूईचे टायटल आपल्या नावे केले होते. खली 2006 पासून 2014 पर्यंत डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये राहिला आणि यादरम्यान त्याने दिग्गज पहिलवान ज्यामध्ये अंडरटेकर, केन, बिग-शो, जॉन सीना, ब्रोक लेसनर, रे-मीस्टिरियो, द रॉक, ट्रिपल एच, रेंडिऑर्टनसह अनेक पहिलवानांसोबत फाइट केली आणि जिंकलादेखील. 46 वर्षीय खली 157 किलो वजन गटातील खेळाडू आहे. त्याचिं हाइट 7 फुट 1 इंच आहे. खलीने रेस्लिंगसोबतच हॉलिवूड बॉलीवुड आणि टेलीव्हिजन शोमध्येही काम केले आहे.

  पंजाब पोलीस जॉइन केल्यानंतर बदलले नशीब...
  दिलीप सिंह राणाचा जन्म हिमाचल प्रदेशच्या एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सात भाऊ, बहिणींमध्ये त्याचे शरीर वेगळेच होते. सुरुवातीच्या काळात खली मजुरी करायचा. एकदा पंजाब पोलिसमधील डीजीपी असलेले एमएस ढिल्लों हिमाचलला गेले होते. तेव्हा त्यांची नजर दिलीप सिंह राणावर पडली. त्यांनी खलीला पंजाब पोलीस जॉइन करून दिले, त्यानंतर खली प्रोफेशनल रेस्लिंगमध्ये आला आणि भारताचे नाव उंचावले.

  ग्रेट कालीपासून बनला द ग्रेट खली...
  खलीने सांगितले की, मी भारतातून आलो होतो त्यामुळे येथे डब्ल्यूडब्ल्यूई मॅनेजमेंटने भारताची संस्कृती आणि इतिहास पहिला. सुरुवातीच्या काळात फाइट रेस्लिंगच्या दिग्गज खेळवुनसोबत झाली होती आणि मी सर्वांना हरवले होते. त्यामुळे त्यांनी काली मातेने जसे राक्षसांचे रूप धारण केले होते, त्याचप्रमाणे मलाही ग्रेट काली हे नाव दिले पण धार्मिक गोष्टीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये आणि वाद-विवादापासून वाचण्यासाठी ग्रेट काली नंतर द ग्रेट खली बनले.

Trending