आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी राहिली आहे पाकचे नवे Captain इम्रान खान यांची आतापर्यंतची राजकारणातील Test

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. शुक्रवारी संसदेत झालेल्या निवडणुकीत त्यांची निवड करण्यात आली. पण इम्रान यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी 21 वर्षे परिश्रम करावे लागले. 


21 वर्षांपूर्वी झाले होते डिपॉझिट जप्त, आता पंतप्रधान

पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे इम्रान खान पंतप्रधानपदी निवडले गेले आहेत. 1992 चा क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्याच्या 4 वर्षांनंतरच इम्रानने राजकारणात एंट्री घेतली होती. यानंतर 1997 मध्ये त्यांनी पहिली सर्वसाधारण निवडणूक लढली. 21 वर्षांपूर्वी झालेल्या या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 7 जागांवर निवडणूक लढली, परंतु या सर्व जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. इम्रान स्वत:ला सुपरस्टार मानायचे, परंतु या निवडणुकीने त्यांचा समज चुकीचा ठरवला होता.


2002 मध्ये उघडले होते खाते:
2002 मधील निवडणूकही इम्रान खानसाठी खास नव्हती. यात इम्रानला मियांवाली जागेवर विजय मिळाला होता, परंतु त्यांच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. 2008 च्या सर्वसाधारण निवडणुकीवर इम्रान खानने बहिष्कार केला होता. त्यांचा आरोप होता की, निवडणुकीत अनियमितता केली जात आहे.

 

2013 मध्ये पीटीआय बनला दुसरा मोठा पक्ष: 
या निवडणुकीत इम्रान खानने 4 जागांवरून निवडणूक लढली. तीन जागांवर त्यांना विजय मिळाला होता, परंतु लाहोरमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यादरम्यान पाकिस्तानी जनतेत इम्रान खानचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला होता. पंजाबात त्याच्या सभांना प्रचंड गर्दी पाहून याचा अंदाज येतो. एका निवडणूक सभेदरम्यान ते लिफ्टमधून पडून जखमी झाले होते. दुखापतीनंतर सहानुभूतीचाही त्यांना फायदा झाला होता.

 

हुकूमशहा झिया उल हक त्यांना कॅबिनेट मंत्री बनवणार होते : 
1987 मध्ये इम्रान खान क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात होता. तत्कालीन लष्करी हुकूमशहा आणि राष्ट्राध्यक्ष झिया उल हकने नॅशनल टेलिव्हिजनवर इम्रानला निवृत्तीची घोषणा परत घेण्याची विनंती केली होती. 1998 मध्ये तर हुकूमशहाने इम्रानला कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफरही दिली होती. इम्रानने खेळ कायम ठेवला आणि नंतर 1992 मध्ये टीमला वर्ल्ड कप जिंकवला. इम्रानने स्वत: आपल्या आत्मचरित्रात लिहिले की, जेव्हाही पाकिस्तान मॅच जिंकायचा, तेव्हा जनरल झिया उल हक त्यांना फोन करून शुभेच्छा द्यायचे.

 

तालिबानला प्रोत्साहन देणाऱ्या ISI चीफने इम्रानला राजकारणात आणले:

लेफ्टनंट जनरल हामिद गुल आयएसआय चीफ होते. ते एकेकाळी पाकिस्तानातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते. तालिबानला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. गुल यांनीच इम्रानला क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर राजकारणात येण्यासाठी प्रेरित केले आणि राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला.

 

मुशर्रफची बाजू घेतली इम्रान खानने : 
1999 मध्ये सेनाध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सत्तापालट केला आणि नवाझ शरीफ सरकार बरखास्त केले. त्या वेळी पाकिस्तानातील जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष मुशर्रफविरुद्ध होते, परंतु एकटा इम्रान खान त्यांच्या बाजूने उभा होता. त्यांनी लष्करी हुकूमशाही पाकिस्तानसाठी चांगली असल्याचे सांगितले होते.

 

दहशतवाद्यांशी संवाद साधायचा आहे इम्रान खानला: 
इम्रानच्या पक्षाचे तालिबानी विचारधारेच्या कट्टरपंथी समी-उल-हक संघटनेशी चांगले संबंध आहेत. ते नेहमी दहशतवाद्यांशी संवाद साधण्याच्या बाजूचे आहेत. यासाठी पाकिस्तानात त्यांच्यावर नेहमी टीकाही होते. अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना हरकत उल मुजाहिदीनने निवडणुकीपूर्वी इम्रानला समर्थन दिले होते. इम्रानच्या पक्षाच्या उमेदवारांसोबत या संघटनेच्या दहशतवाद्यांनीही फोटो काढले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...