आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉय आफ गिव्हिंगनुसार कुणीही उपाशी झोपू नये असा प्रयत्न करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात ज्याचा दातृत्वावर विश्वास आहे, तोच सर्वात सुखी आहे. दरवर्षीप्रमाणे आज २ ऑक्टोबर रोजी जॉय ऑफ गिव्हिंग आठवडा सुरू होत आहे. दैनिक दिव्य मराठी हा आठवडा 'दातृत्वाचे सुख' म्हणून साजरा करतो. या उपक्रमात आम्ही एक ठोस उद्देश वाचकांसमोर ठेवत आहोत. या आठवड्यात कुणीही उपाशीपोटी झोपू नये, हा प्रमुख उद्देश आहे. तुम्ही ठरवलेच तर या आठवड्यात अनेक चेहऱ्यांवर तृप्ती आणि आनंद पाहू शकाल. हा उद्देश साध्य करणेही अत्यंत सोपे आहे. सकाळी तुम्ही आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाल तेव्हा सोबतच्या डब्यात दोन चपात्या आणि भाजी थोडी जास्तीची घ्या. हे अन्न एका कागदात गुंडाळून ठेवा. रस्त्यात कुणी गरजू भेटला तर त्याला भोजनाचे हे पॉकेट देऊन टाका. यामुळे एखाद्याचे एका वेळचे जेवण होईल आणि तुम्हालाही आत्मिक समाधान मिळेल.  यंदा हा दातृत्वाचा सप्ताहही नवरात्रातच आला, हा पण एक योगायोग आहे. शिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० जयंती पण आहे. श्रद्धेच्या या पावन पर्वात गांधीजींच्या स्मरणाने गरजंूना भोजन देेण्याचे सर्वात मोठे पुण्यकर्म या निमित्ताने होईल. दिव्य मराठीसह भास्कर समूहातील कोट्यवधी वाचकांपैकी काही कोटी वाचक या उपक्रमात सहभागी झाले तर तेवढ्या लोकांना रोज एक वेळचे भोजन मिळू शकेल. - म्हणूनच आपल्या शहरात या आठवड्यात एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही, असा संकल्प करा.

- विनम्र आग्रहासह भास्कर परिवार.

बातम्या आणखी आहेत...