Home | Khabrein Jara Hat Ke | jubljana is the first European capital to commit to going zero waste

या देशात कधीच साचत नाही कचरा, 68% कचऱ्याची होते रीसायकिलींग

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 26, 2019, 05:20 PM IST

युरोपातील इतर देशांमध्ये बायोवेस्टला घरोघरी जाऊन गोळा करणे 2023 मध्ये अनिवार्य करण्यात येणार आहे

 • jubljana is the first European capital to commit to going zero waste

  जूबलिजाना- स्लोवेनियाची राजधानी असलेले जुबलिजानामध्ये कचरा करण्यास सक्त मनाई आहे. येथे कचरा न फेकता त्याचा पुरेपूर वापर केला जातो. त्यासाठी एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. लोकांनाही एका जागेवरच कचरा टाकता येईल यासाठी अनेक ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले आहेत.

  जुबलिजानाच्या वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या नीना सेंकोव्हिच यांनी सांगितले की, 15 वर्षांपूर्वी कचरा गोळा करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला लोकांनी नकार दिला होता, पण आज संपुर्ण चित्र बदलले आहे. कचऱ्यामुळे आपल्या पर्यावरणाला धोका असतो त्यामुळे ही मोहिम सुरू करण्यात आली.

  17 वर्षापूर्वी सुरू केला प्रयत्न
  2002 मध्ये जुबलिजानाच्या स्थानिक प्रशासनाद्वारे, रद्दी पेपर, काच यासारख्या वस्तूं गोळा करण्यासाठी रस्त्याच्या कडेला स्टीलचे कंटेनर ठेवण्यात आले. चार वर्षांनंतर 2006 मध्ये कर्मचाऱ्यांनी नैसर्गिकरित्या नष्ट होणाऱ्या (बायोडिग्रेडेबल) कचऱ्याला घरोघर जाऊन गोळा करणे सुरू केले. त्यामुळे युरोपातील इतर देशांमध्ये बायोवेस्टला घरोघरी जाऊन गोळा करणे 2023 मध्ये अनिवार्य करण्यात येणार आहे. तर ही मोहिम जुबलिजानामध्ये दोन दशकापूर्वीच सुरू झाली आहे.


  चांगला परिणाम
  2008 मध्ये जुबलिजानाद्वारे एकूण 29.3 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 2019 मध्ये सुमारे 68 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया झाली. कचऱ्या प्रक्रिया करण्यात जूबलिजाना युरोपमधील एकमेव राजधानी आहे. तसेच, जुबलिजानामध्ये बायोलॉजिकल वेस्ट साफ करण्यासाठी जगातील सर्वात चांगला प्लँट उभारण्यात आला आहे. त्यामुळे आता 2025 पर्यंत 75 टक्के कचरा रिसायकल करण्याचे लक्ष जूबलिजानाचे आहे.

  2015 मध्ये यांनी रीजनल सेंटर फॉर वेस्ट मॅनेजमेंट सुरू केले होते. आज संपुर्ण स्लोव्हेनियाच्या एकूण सुविधांपैकी एक तृतियांश सेवा याच प्रादेशिक केंद्राद्वारे पूर्ण होत आहेत. तसेच, येथील घरातून निघणार्या 95 टक्के कचऱ्यापासून विज आणि नैसर्गिक गॅसदेखील तयार केला जातो. आणि उर्वरित राहणाऱ्या बायोवेस्टचा उच्च गुणवत्तेच्या खत तयार केले जाते. विशेष म्हणजे, घरातील कचरा एकत्रित करण्यासाठी जूबलियानामध्ये दोन सेंटर बनवण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये तीन आणखी सेंटरची उभारणी करण्याची त्यांची योजना आहे. एका स्थानिकाने सांगितले की, आम्हाला चांगले माहिती आहे की, कचरा कुठे टाकायचा. या सुविधेमुळे आम्हाला चांगली सवय लागली आहे.

  अशा प्रकारे स्वच्छ राहते शहर
  स्लोव्हेनियामध्ये जागेची अतिशय कमतरता आहे. त्यामुळे 'वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, 'वोका स्नागा'ने जमीनमध्येच कचरा टाकण्यासाठी 67 यूनिट कंटेनर निर्माण केले आहेत. आणि लोकांना ते उघडण्यासाठी नियमित कार्ड देले गेले आहेत. शहराला ऐतिहासिक ओळख असल्यामुळे येथे सतत पर्यटक येतात. त्यामुळे कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायी चालावे लागते. सोबतच रस्ता स्वच्छ करण्यासाठी एक विशेष गाडी तिथे उपलब्ध असते. सफाईसाठी बायोडिग्रेडेबल डिटर्जेंटचा वापर केला जातो. शहरातील प्रत्येक कोपऱ्यावर वेगवेगळ्या कचऱ्यासाठी कंटेनर ठेवले आहेत.

 • jubljana is the first European capital to commit to going zero waste
 • jubljana is the first European capital to commit to going zero waste
 • jubljana is the first European capital to commit to going zero waste
 • jubljana is the first European capital to commit to going zero waste

Trending