आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा शुक्रवारी कार्यकाळातील शेवटचा दिवस होता. १७ नोव्हेंबरला ते निवृत्त होत आहेत. परंपरेनुसार न्या. गोगोई शेवटच्या दिवशी नवे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्यासोबत कोर्टात दाखल झाले. केवळ ३ मिनिटे ते आसनावर बसले. १० प्रकरणांत त्यांनी नोटिसा व स्थगिती आदेश दिले. नंतर त्यांनी सर्वांचे आभार मानले.
एक काळ होता, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींसोबत १२ जानेवारी २०१८ रोजी न्या. रंजन गोगोई यांनी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती. या घटनेला एक वर्ष १० महिने उलटले आहेत आणि शुक्रवारी न्या. गोगोई यांनीच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी माध्यमांपासून दूर राहावे, असा सल्ला दिला. पत्रकारांशी बोलण्याऐवजी त्यांनी लेखी वक्तव्य जारी केले. या पत्रात न्या. गोगोई म्हणतात, घटनापीठातील जजनी आपल्या स्वायत्ततेचा वापर करत असताना मौन राखणे अपेक्षित असते. जज बोलतात, परंतु ते त्यांच्या कार्यात अनिवार्य असेल तर... कटुसत्य नेहमी मनात ठेवले पाहिजे. मी अशा संस्थेत काम केले ज्या संस्थेची शक्ती जनतेच्या विश्वासावर अवलंबून असते. आपल्या या संस्थेचा संबंध जनसामान्यांशी असतो. प्रेसच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जाण्याची आपल्या या संस्थेच्या जजना गरज नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.