आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Judgmental Hai Kya' Got A Positive Review From Media, While Kangana Said 'Thank You, You All Were Very Angry With Me'

'जजमेंटल है क्या' ला मीडियाकडून मिळाला पॉजिटिव रिव्ह्यू, तर कंगना म्हणाली - 'धन्यवाद, तुम्ही सगळे माझ्यावर खूप नाराज झाले होते' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चित्रपट 'जजमेंटल है क्या' च्या सक्सेसमुळे कंगना रनोट खूप खुश आहे. ती चित्रपट रिलीज झाल्यानंतर आपल्या फॅमिलीसोबत स्पीती व्हॅलीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेलने ट्विटरवर कंगनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कंगना फॅन्स आणि मीडियाला धन्यवाद म्हणताना दिसत आहे.   

 

निष्पक्षपणे चित्रपटाचे विश्लेषण केल्याबद्दल कंगना पत्रकारांना म्हणाली धन्यवाद... 
रंगोलीने जो व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "प्रिय मित्रांनो, कंगनाने तुम्हा सर्वांसाठी एक स्पेशल मॅसेज पाठवला आहे. यामध्ये कंगना म्हणते आहे, 'चित्रपटाला तुम्ही दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांसाठी धन्यवाद, बॉबी (चित्रपटातील कंगनाच्या भूमिकेचे नाव) एक अशी मुलगी आहे, जिचे नशीब फुटके आहे. मेंदू कार्यक्षम नाही, त्या मुलीला एवढे प्रेम दिले, तिला आपलेसे केले, ज्यामुळे मला ही अपेक्षा आहे की, आपल्या समाजामध्ये कधी ना कधी योग्य ह्यूमन राइट्स मिळू शकतील आणि सर्वात जास्त धन्यवाद मीडियाच्या लोकांना देऊ इच्छिते, जे माझ्यावर खूप जास्त नाराज झाले होते, चित्रपटाचा प्रामाणिकपणे रिव्यू देण्यासाठी आणि यावर्षीच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक बनावण्यासाठी तुम्हाला धन्यवाद. आपली पर्सनल आवड आणि नावड बाजूला ठेऊन चित्रपटाला एक कला म्हणून पहिले, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, तुमच्याकडून खूप प्रेरणा मिळते.