आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Judgmental Hai Kya' : Mental, Murder, And Love Exploring Romance And Relationships Between Insane Persons

'जजमेंटल है क्या' : मेंटल, मर्डर आणि प्रेम - सनपट व्यक्तींमधील रोमान्स आणि नात्यांचे स्तर उलगडणारी कथा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विक्षिप्त आणि सनपट भूमिकांचा रोमान्स आणि रिलेशनशिप्सचे स्तर उलगडण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट आहे ‘जजमेंटल है क्या’. जग दोन मेंटल व्यक्तींच्या नजरेतून दाखवले गेले आहे.  

 

स्टार रेटिंग - 3/5
स्टारकास्ट - कंगना रनोट, राजकुमार राव, जिमी शेरगिल, अमायरा दस्तूर
दिग्दर्शक - प्रकाश कोवेलामुदी
निर्माता - एकता कपूर, शोभा कपूर, शैलेश आर सिंह
जॉनर - सायकॉलॉजिकलब्लॅक कॉमेडी
संगीत - तनिष्क बागची, रचित अरोरा
वेळ - 121 मिनिटे 

 

'जजमेंटल है क्या' ची कथा... 
रोमँटिक आणि ब्लॅक कॉमेडीच्या जॉनरमध्ये ताजेपणा आणण्याचा प्रयत्न करताना दिसणाऱ्या या चित्रपटाची नायिका बॉबीचे बालपण अत्यंत खडतर असते. तिचे वडील छोट्या छोट्या गोष्टींमुळे तिच्या आईला मारतात. एका दुर्घटनेत बॉबीच्या हातून दोघांचा मृत्यू होतो. ती आपल्या आजोबांसोबत राहते आणि मोठी होते. बॉबी शंकेखोर स्वभावाची बनते. 

 

वरुण तिचा बॉयफ्रेंड आहे, पण दोघांमध्ये कधीच टिपिकल रोमान्स होत नाही. त्यामुळे वरुण अस्वस्थ राहतो. एक दिवस केशव आणि रीमा, बॉबीचे किरायदार बनून येतात. केशव कथेचा नायक आहे आणि रीमा त्याची बायको. पहिल्याच नजरेत केशव आणि रीमा यांच्यातील प्रेम पाहून बॉबीच्या मनातही त्या भावना उमलतात. प्रेक्षकांना वाटते की, बॉबी केशवबद्दल ऑब्सेस्ट झाली आहे. 

 

अचानक एक दिवस सिलेंडर फुटल्याने रीमाचा मृत्यू होतो. आता बॉबी तिच्या हत्येचा आरोप केशववर करते, पण पोलिसांना काहीही पुरावा मिळत नाही. केशव सुटतो. गोष्ट दोन वर्षांनंतर लंडांपासून पुन्हा सुरु होते. बॉबीला तिचे आजोबा टिपूच्या मावस बहिणीकडे थिएटर करण्यासाठी पाठवतात. पण येथेही नशीब बॉबीची वाटच पाहात असते. मावस बहिणीचे लग्न केशवसोबत होत असते, जो श्रवण बनून तिथे राहात असतो. बॉबी आणि केशव यांच्यामध्ये पुन्हा उंदरा मांजराचा खेळ सुरु होतो. बॉबी जो विचार करत आहे, ते सत्य आहे की, मग तिच्या मनाचे खेळ. चित्रपट यावरच आधारित आहे. 

 

उत्तम नाही केवळ चांगला बनून राहिला चित्रपट... 
बॉबीला मेंदूचा आजार अक्यूट सायकोसिस आहे. यामध्ये व्यक्तीला सत्य आणि भास यांच्यातील फरक काळात नाही. या चित्रपटाच्या रायटर कनिका ढिल्लन आणि डायरेक्टर प्रकाश कोवेलामुदीला नायिकेमधील या उणिवेमुळे चित्रपटाला थ्रिलर बनवण्यात खूप मदत झाली. चित्रपटाचा पहिला हाफ तर निश्चितच बॉबी, वरुणचे वाद आणि केशव व रीमा यांच्या आपापसातील संबंधांमुळे वेगाने पूर्ण होतो, भूमिकांच्या हजारजबाबीपणामुळे घटनाक्रम पुढे जाण्यात मदत होते. समस्या इंटरवलनंतर होऊ लागतात. केशवची भूमिका निखरून सामोर येत नाही आणि शेवटी एक पोटेंशियल चित्रपट बेटर बनण्याऐवजी केवळ गुड बनून राहतो. 

 

कंगनाचे दर्जेदार प्रदर्शन... 
अदाकारी, सिनेमॅटोग्राफी आणि कॉस्ट्यूम्स यांच्यामुळे चित्रपटाचा नाक्कीचक वेगळा प्रभाव पडतो. बॉबीची भूमिका कंगना रनोटने आपली अदाकारी सर्वोत्तम केली आहे. मानसिकरित्या परेशान असलेल्या युवतीची लक्षणे तिने उत्तमरित्या दाखवले. बॉबीची भूमिका तिने इंटेंस बनवली आहे. एवढे जास्त की, प्रेक्षकांना त्या भूमिकेची दया येण्याऐवजी चीड येते. हे एका कलाकाराचे यश असते. केशवचे पात्र राजकुमार रावने इंटेंस आणि लाउड होण्यापासून वाचवले. असे त्याने का केले, याचे उत्तर तर तो किंवा रायटर-डायरेक्टरच देऊ शकतात. तरीदेखील राजकुमार राव आणि कंगना रनोटने एकमेकांना कॉम्पिलमेंट केले आहे.  

 

रीमाच्या रोलमध्ये अमायरा दस्तूरचा प्रेझेन्स स्क्रीनवर फ्रेशनेस आणतो. वरुणच्या भूमिकेत हुसैन दलालने प्रभावी कॉमेडी केली आहे. बॉबीच्या मावस बहिणीच्या भूमिकेत अमृता पुरीला काही विशेष करण्याची संधी नव्हती. 

 

रायटर कनिका ढिल्लनने कहाणीच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र तिला योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही. सेकेंड हाफमध्ये कथेत खूप कन्फ्यूजन, चढ-उतार, रामायणाचे निष्कारण दर्शन यांसारख्या गोष्टी कथेला क्लिष्ट करतात, गुंतवून टाकतात. त्या कदाचित चित्रपटाचे गीत-संगीत आणि कॅमेरा वर्कमुळे दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात. ‘रंगून’ च्या पंकज कुमारने येथे मुंबई, लंडन आणि पात्रांच्या मनात सुरु असलेल्या शंका-कुशंका उत्तम पद्धतीने कॅप्चर केल्या आहेत. शीतल शर्माने कॉस्ट्यूमच्या बाबतीत आपले काम ठीक व्यवस्थित केले आहे.