आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात जुही चावला दोनदा होती प्रेग्नेंट, दोन्ही वेळा प्रेग्नेंसीत केले होते शूटिंग, 7 वर्षांनी मोठ्या विवाहित बिझनेसमनसोबत केले होते लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 51 वर्षीय अभिनेत्री जुही चावला बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 13 नोव्हेंबर 1967 रोजी अंबाला (हरियाणा) येथे जन्मलेल्या जुहीने  'सल्तनत' (1986) या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. पण तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी आमिर खानसोबतच्या 'कयामत से कयामत तक'पासून मिळाली होती. मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत आलेली जुही तिच्या कामाविषयी कायम प्रामाणिक राहिली. याच कारणामुळे दोन्ही प्रेग्नेंसीच्या काळात तिने शूटिंगपासून ब्रेक घेतला नव्हता.


ते दोन चित्रपट ज्यावेळी जुही होती प्रेग्नेंट...  
- जुही चावलाने 1995 मध्ये स्वतःपेक्षा वयाने सात वर्षांनी मोठे असलेले बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केले. जुही जय यांची दुसरी पत्नी आहे. ज्याकाळात जय जुहीला भेटले होते, त्यावेळी त्यांची पहिली पत्नी सुजाता बिडलाचे निधन झाले होते. एका प्लेन क्रॅशमध्ये त्या मृत्युमुखी पडल्या होत्या. या घटनेनंतर जुही आणि जय यांच्यात जवळीक वाढली आणि नंतर दोघांनी लग्न केले. या दाम्पत्याला जान्हवी ही एक मुलगी आणि अर्जुन हा एक मुलगा आहे.  जेव्हा जुही पहिल्यांदा गर्भवती राहिली होती, त्याकाळात ती 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया' (2001) या चित्रपटाचे शूटिंग करत होकती. तिच्या मुलीच्या जन्माच्या दहा महिन्यांनी म्हणजे डिसेंबर महिन्यात हा चित्रपट रिलीज झाला होता. 2003 मध्ये आलेल्या 'झंकार बीट्स' या चित्रपटात जुहीने प्रेग्नेंट महिलेचे पात्र साकारले होते. रंजक बाब म्हणजे त्याकाळात जुही प्रत्यक्षात सात महिन्यांची गर्भवती होती. ही तिची दुसरी प्रेग्नेंसी होती. 2003 मध्ये तिचा मुलगा अर्जुनचा जन्म झाला. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशा आणखी काही अभिनेत्रींविषयी, ज्यांना शूटिंगच्या काळात मिळाली गुड न्यूज...

बातम्या आणखी आहेत...