आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Juhi Chawla Luxurious Bungalow: Juhi Daughter Jhanvi And Son Stay Away Limelight

अतिशय लग्झरिअस आहे जुही चावलाचा बंगला, लिव्हिंग एरियापासून ते ड्राइंग रुमपर्यंत लावले आहेत पेंटिंग्स : Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री जुही चावला हिचा आज (13 नोव्हेंबर) वाढदिवस असून तिने वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. आपले खासगी आयुष्य कायम लो प्रोफाइल ठेवणा-या जुहीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या लग्झरिअस बंगल्याचे निवडक इनसाइड फोटोज दाखवत आहोत. जुहीचा बंगला वीर भवन हा मुंबईतील मालाबार हिल्स येथे रिट्ज रोडवर आहे. जुहीला पेंटिग्सची विशेष आवड आहे. तिने तिच्या बंगल्याच्या लिव्हिंग एरियापासून ड्राइंग रुमपर्यंत अतिशय सुंदर पेंटिंग्स लावल्या आहेत. जुहीला संगीताचीही आवड असल्याचे फार कमी जणांना ठाऊक असावे. याच कारणामुळे तिने तिच्या घरात एक म्युझिक रुमही तयार केली आहे. येथे हार्मोनियमपासून ते तबला आणि तानपुरा ठेवण्यात आला आहे. येथे ती संगीताचा रियाज करते.
 

फॅमिलीला लो प्रोफाइल ठेवले जुही.. 

- 13 नोव्हेंबर 1967 रोजी अंबाला (हरियाणा) येथे जन्मलेल्या जुहीची दोन्ही मुले कधीही बॉलिवूड पार्टी किंवा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. 
- जुही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलणे पसंत करत नाही. याच कारणामुळे तिने तिचे खासगी आयुष्य लो प्रोफाइल ठेवले आहे. तिच्या कुटुंबीयांची अतिशय कमी छायाचित्रे बघायला मिळतात.
- जुहीची मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन लंडनमध्ये शिकत आहेत. जुही अनेक ठिकाणी तिच्या पतीसोबत दिसते, मात्र तिच्या मुलांना ती लाइमलाइटपासून दूर ठेवते. 

- याचवर्षी ऑगस्ट महिन्यात जुहीची मुलगी जान्हवी हिने शाळेतील टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले होते. तेव्हा जुहीने मुलीचा फोटो शेअर केला होता. 

 

यशस्वी बिझनेसवुमन आहे जुही...
- 1984 मध्ये मिस इंडिया आणि 1984 मध्येच मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धत बेस्ट कॉश्च्युम अवॉर्ड आपल्या नावी करणारी जुही एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. 
- जुही चावला आणि जय मेहता, शाहरुख खानसोबत आयपीएल टीम कोलकाता नाइट राइडर्सचे मालक आहेत.  

बातम्या आणखी आहेत...