आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरसोबत एक गाणं शूट करण्यासाठी जूही चावलाने दिला होता नकार, मग मान्य केले तर शूटिंगदरम्यान झाली होती अनकम्फर्टेबल, नंतर खूप रडली होती 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनिल कपूर आणि जूही चावला स्टारर फिल्म एक लडकी को देखा तो ऐसा लगा सिनेमाघरात रिलीज झाली आहे. सुमारे 12 वर्षांनंतर हे दोघे एकत्र काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी सलामे इश्क या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, अनिल कपूरसोबत एक फिल्म करतांना जूही चावलाची हालत वाईट झाली होती. झाले असे होते कि, जूही चावलाने 1994 मध्ये अनिल कपूर यांच्यासोबत फिल्म अंदाजमध्ये काम केले होते. डेविड धवनच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या या फिल्मला पहलाज निहलानी यांनी प्रोड्यूस केले आहे. फिल्मचे अनेक डायलॉग डबल मिनिंग होते तर त्यातील एक गाणंदेखील वादांत अडकलेले होते. खडा है खडा है असे बोल असलेले गाणे आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रीत केले गेले होते. असे सांगितले जाते की, गाणे डबल मिनिंग असल्यामुळे जूही चावलाने हे गाणे शूट करण्यासाठी नकार दिला होता.  

 

शूटिंगच्यावेळी अनकम्फर्टेबल झाली होती जूही... 
जूही चावलाने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, त्या गाण्याचे बोल इतके व्हल्गर होते की, याच्या शूटिंगदरम्यान ती अनकम्फर्टेबल झाली होती. स्क्रिप्ट वाचल्यावर तीने डायरेक्टर डेविड धवनला स्पष्टपणे नकार दिला होता. पण सेटवर तयारी पूर्ण झाली होती. त्यामुळे  ती तयार तर झाली झाली पण  खूप रडली होती. जुहीच्या सांगण्यानुसार, तिला ते फार लाजिरवाणे वाटत होते. 

 

जेव्हा चार वर्षांच्या मुलाशी केला होता साखरपुडा... 
- जूही चावलाचा हा किस्सा फिल्म 'क़यामत से क़यामत तक' च्या सेटवरच आहे. ज्यामुळे तिला खरी ओळख मिळाली होती. झाले असे होते की, शूटिंगदरम्यान सेटवर आमिर खानचा चार वर्षांचा भाचा इमरान खानदेखील यायचा. इमरानला जूही खूप आवडायची. सांगितले जाते की एक दिवस सेटवर इमरानने ना केवळ जूहीला निरागसपणे प्रपोज केले तर एक रिंगसुद्धा घातली. जूहीला इमरानची ती निरागसता फारच भावली आणि तिनेही रिंग एक्सेप्ट केली. स्वतः जूहीने हा किस्सा एका इंटरव्यूदरम्यान सांगितला होता. 'क़यामत से क़यामत तक' बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर त्याहाराला होता आणि जूहीला यासाठी बेस्ट डेब्यूचा फिल्मफेयर अवॉर्डही मिळाला होता. जूहीने 1995 मध्ये बिजनेसमॅन जय मेहता यांच्यासोबत लग्न केले होते आणि आता तिला 17 वर्षांची मुलगी जान्हवी आणि 15 वर्षांचा मुलगा अर्जुनची आई झाली आहे. 

 

सलमान खानला करायचे होते जूहीसोबत लग्न... 
- एका इंटरव्यूमध्ये सलमान खानने सांगितले होते की, त्याला जूही चावलासोबत लग्न करण्याची  इच्छा आहे आणि त्यासाठी मॅरेज प्रपोजल घेऊन तो तो टिपूच्या वडिलांकडेही गेला होता. सलमाननुसार, त्याने वडिलांसमोर जूहीचे खूप कौतुक केले. पण ते आपल्या मुलीचा हात त्याच्या हातात देण्यासाठी तयार झाले नाहीत. जेव्हा सलमानने विचारले की, तुम्ही नकार देत आहात ? तेव्हा जूहीचे वडील म्हणाले, "मी त्यांच्या बिलमध्ये फिट बसलो नाही". सलमान खान आजही अनमॅरिड आहे. मात्र कतरिना, ऐश्वर्या सह अनेक बॉलिवूड अभिनेत्रीसोबत त्याचे रिलेशन होते. 

 

बातम्या आणखी आहेत...