आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलात वेट्रेस होती, चपलांच्या दुकानातही काम केले; अभिनय केला तर थेट सुपरस्टारच झाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट््स हिचा जन्म २८ ऑक्टोबर १९६७ रोजी जॉर्जियामध्ये झाला. तिची आई बॅटी लू ब्रेडेमास हीदेखील अभिनेत्रीच होती.आपले पती वॉल्टर ग्रेडी रॉबर्ट््स यांच्यासोबत ती अभिनयाचे क्लासेस चालवत होती. ज्युलियाशिवाय कुटुंबात दोन एरिक आणि लिसा ही दोन मुलेही होती.सर्वच मुले आपल्या आईप्रमाणे हॉलीवूडचे अभिनेतेच झाले. ज्युलिया जन्मल्यानंतर आईला नोकरी सोडावी लागली. असे केल्याने कुटुंब मात्र अडचणीत आले. कुटुंबाची ही स्थिती पाहून कॉरेटा स्कॉट किंग या विधवेने बरीच मदत केली. बैटीची हॉस्पिटलची बिलेही तिनेच भरली. 


ज्युलिया जेव्हा पाच वर्षांची होती, तेव्हा आई-वडिलांचा घटस्फाेट झाला. आपण प्राण्यांशी चांगला संवाद करू शकतो, असे ज्युलियाला वाटत असे, त्यामुळे आपण प्राण्यांचे डॉक्टर व्हावे, अश स्वप्ने ती पाहात असे. शाळेमध्ये असतानाही आपण काही वेगळे करावे, असे तिला वाटत असे. आपण काही तरी खास करावे, असे तिला वाटत असे. पण तिच्याकडे काही खास कौशल्य नव्हते. आपला भाऊ एरिक रॉबर्ट््समुळे प्रेरित होऊन अनेक वेळा स्थानिक नाट्य कार्यक्रमात ती भाग घेत असे. ती दहा वर्षांची असताना वडिलांचे कॅन्सरने निधन झाले. 
त्यांच्याशी रोज फोनवर चर्चा करूनही आपले वडील कॅन्सरने आजारी आहेत, हे तिला जराही जाणवले नाही. एका मुलाखतीत ती म्हणते की, वडिलांच्या निधनानंतर मी त्यांच्याशी स्वप्नात बोलत होते. नेमके याच काळात ज्युलियाला अडखळत बाेलण्याची नवीनच समस्या निर्माण झाली. ही समस्या आनुवंशिक असल्याने ती याबद्दल बोलायलाही तयार नसे. वर्गात जेव्हा तिला काही वाचायला सांगितले जात असे तेव्हा तिचे अडखळत बोलणे हास्यास्पद ठरत असे. रोज मोठ्याने वाचून ती ही कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करत असे. शेवटी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर तिने या समस्येवर विजय मिळवला. 


वयाच्या तेराव्या वर्षी ज्युलियाने पिज्जोरिया नावाच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. शाळेच्या शिक्षणाबरोबरच रिकाम्या वेळेत ती चपलांच्या दुकानात काम करत असे. यानंतर स्नॅक बार आणि कॅफेमध्येही काही काळ काम केले. शाळा संपल्यानंतर जॉर्जिया विद्यापीठात तिने प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. पण यात तिला यश आले नाही. यानंतर ती आपली बहीण लिसा हिच्याकडे न्यूयॉर्कला आली. तेथे जाऊन तिने अभिनयाचे क्लासेस सुरू केले. 


१९८७ साली 'ब्लड रेड' नावाच्या चित्रपटात एरिक या तिच्या भावाने तिला एक छोटा रोल देऊ केला. ही भूमिका पार पाडण्यासाठी तसा फार अभिनय करण्याची गरज नव्हती. यानंतर ज्युलियाने सॅटिफॅक्शन चित्रपटात रॉक सिंगरची भूमिका केली. ही भूमिका करण्यासाठी तिला काही वाद्येही शिकावी लागली. त्याच वर्षात ज्युलियाला पहिला मोठा रोल मिळाला. 'मिस्टिक पिज्जा' ही एक रोमँटिक कॉमेडी होती. यात ज्युलियाने वेट्रेसचे काम केले होते. यानंतर आला 'स्टील मॅग्नोलियाज'.सहा महिलांच्या जीवनावर हा चित्रपट होता. ज्युलियाने यात शेलबीची भूमिका केली. या रोलसाठी तिला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला होता. १९८९ मध्ये हॅरी मार्शलचा प्रिटी वुमन आला. त्यात रिचर्ड गेयर हे मुख्य अभिनेते होते. ज्युलिया या चित्रपटासाठी पहिली पसंत नव्हती. ही एक वेश्येची भूमिका होती. हा रोल अनेक नामवंत नट्यांनी नाकारला होता. हा रोल शेवटी ज्युलियाला मिळाला आणि यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. याच चित्रपटाने ज्युलियाला स्टार बनवले. यानंतर तिला अनेक मोठे रोल मिळाले. 


ज्युलिया रॉबर्ट्‌सच्या जीवनातून मिळणारी शिकवण 
- दृढ इच्छाशक्ती आणि हिमतीने आपल्या कमजोरीवर मात करता येते. 
- तुम्ही आज जे आहात, त्यावरून तुमचे भविष्य ठरत नाही. 
- स्वत:ला साधारण नाही, तर विशेष माना. तरच हे जग तुम्हाला विशेष मानेल. 

बातम्या आणखी आहेत...