आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअप झालेल्या प्रेमवीरांना ज्युलिएटचा दिलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीतील व्हेराेना हे शहर सुंदर अाहेच, मात्र विल्यम शेक्सपिअरची प्रेयसी ज्युलिएट येथेच राहत असे त्यामुळे ते अधिक प्रसिद्ध झाले. तिच्या नावे येथे 'ज्युलिएट क्लब' अाहे. जगभरातील अनेक भाषांतील पत्रे येथे येत असतात. एक तर ज्यांचा प्रेमभंग झालेला असताे किंवा विवाहित हाेण्याच्या इच्छेने व्याकूळ असलेल्या प्रेमवीरांची पत्रे येथे येतात. ज्युलिएटच्या नावे पत्र लिहिले की, अापले प्रेम गवसते असे मानले जाते. मजेशीर बाब म्हणजे सारी पत्रे ज्युलिएटच्या नावे येतात. शेक्सपिअरच्या नावे केव्हातरी एखादे पत्र येते. या क्लबमध्ये डझनावारी स्वयंसेवक अाहेत, जे ज्युलिएटच्या वतीने शेकडाे पत्रांची उत्तरे देत असतात. पत्रांचे उत्तर देणारे स्वयंसेवक अनेक भाषांचे उत्तम जाणकार, अनुवादक, मनाेविश्लेषक, डाॅक्टर, प्रतिभावंत लेखक, उच्चशिक्षित मंडळी अाहेत, जे हे काम नि:शुल्क करतात. या संघटनेला या कामापासून काेणताही अार्थिक वगैरे फायदा हाेत नाही. या क्लबमधील ४१ वर्षीय मार्टिन हाेपले यांनी बीबीसीला सांगितले की, हा क्लब इतका प्रसिद्ध अाहे की, ज्युलिएट, व्हेराेना, इटली एवढा पत्ता लिहिलेला असला तरी येथे पत्र पाेहाेचते. जगभरातून येणाऱ्या या पत्रांमध्ये प्रेमाच्या वाटेत येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठीचे उपाय साधारणपणे विचारले जातात. अापल्या पत्राचे जरूर उत्तर मिळेल या विश्वासानेच लाेक पत्र पाठवत असतात. प्रेमभंग झालेल्यांना माैलिक सल्ला देण्याचा प्रयत्न करण्यावर अामचे अधिक लक्ष असते. माझाही ब्रेकअप झाला हाेता. अापल्याच अनुभवावर अाधारित उत्तरे देण्याचा अामचा प्रयत्न असताे, जेणेकरून पत्रलेखक समाधानी हाेईल. काही पत्रे अशी असतात की, खूप विचार करून उत्तरे द्यावी लागतात. त्यास काही दिवसही लागतात. अतिशय समर्पक उत्तरे देणारी मंडळी या क्लबमध्ये अाहेत. पाेस्टमन दरराेज पत्रांची पाकिटे क्लबमध्ये देऊन जाताे. क्लबचे सदस्य या पत्रांची उत्तरे देण्यात रमून जातात. अापल्या उत्तराने संबंधित प्रेमवीरांच्या समस्येची साेडवणूक हाेऊ शकणार नाही याची अाम्हाला जाणीव असते. परंतु अामची इच्छा अशी अाहे की, लाेकांच्या मनात जिवंत असलेली ज्युलिएट अजूनही जिवंत राहावी, याचसाठी हा पत्रप्रपंच चालला अाहे.  

बातम्या आणखी आहेत...