Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

आज अमावस्या तसेच खग्रास सूर्यग्रहण, तरीही 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास, जुळून येत आहे शुभ योग

दिव्य मराठी

Jul 02,2019 12:15:00 AM IST

मंगळवार 2 जुलै 2019 रोजी मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी होईल. मृग नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असल्यामुळे सर्व सरकारी कामे पूर्ण होतील. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : अबोली | अंक : २ जाळपासच्या प्रवासात रेशीमगाठी जुळतील.शेजारी आपलेपणाने डोकावतील. मुले मात्र अभ्यासाची टाळाटाळ करतील. जास्त वेळ घराबरहेर रहाल.वृषभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ४ कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही उत्तम राहील. प्रिय पाहुण्यांची घरात ये जा राहील. गृहीणींना आवडत्या छंदातूनही अर्थप्राप्ती होईल. संसारात गोडवा राहील.मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ कार्यक्षेत्रात चढाओढ असली तरी तुमच्या प्रामाणिक मेहनतीस यश नक्कीच मळेल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. आज जोडीदाराशी सामंजस्य राहील.कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ आपली मते इतरांना पटावण्याचा अट्टहास नको. आज गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला अवश्यक. घराबाहेर वावरताना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.सिंह : शुभ रंग : हिरवा | अंक : ७ आप्तसवकिय व मित्रमंडळींत तुमचे महत्व वाढेल. आज विरोधकांनाही तुमच्या यशाचा हेवा वाटेल. नव्या व्यावसायिकांना मेहनतीचे फळ दृष्टीक्षेपात येईल.कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ५ नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. वरीष्ठ कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करतील. आज तुमचा अहंकार वाढण्याची शक्यता आहे.तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६ कार्यक्षेत्रात मन निराश करणाऱ्या घटना घडतील. थोर मंडळी उपदेशांचे डोस पाजतील. व्यवसायातील मंदीने बेचैन व्हाल. सत्संगाची ओढ लागेल.वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ द्विधा मन:स्थीती असताना महत्वाचे निर्णय टाळलेले बरे. आज अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल. वाहन चालवताना सावध रहा.धनू : शुभ रंग : मोतिया | अंक : ८ वेळेचे योग्य नियोजन केल्याने क्लीष्ट कामे वेळेत पूर्ण होतील. धंद्यातील स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. जोडीदारासह जुन्या फोटोंचा अल्बम चाळाल.मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७ नोकरीत अाज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. विरोधक तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे. आज पैजा जिंकाल.कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३ तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. प्रतिष्ठीत व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रेमप्रकरणे लग्नाच्या दिशेने पुढे सरकतील. हट्ट पुरे झाल्याने मुले खुष असतील.मीन : शुभ रंग : क्रिम | अंक : २ स्थावर, शेतीवाडी संदर्भातील काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. गृहीणी आज घराची स्वच्छता व सजाट मनावर घेतील. प्रेमप्रकरणे बोअरच करतील.
X